Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये महेश शिंदेंचा विकासकामांचा धडाका! कोरेगाव मतदारसंघात कोट्यवधींची कामे

Koregaon Assembly Election 2024 MLA Mahesh Shinde : अलीकडच्या काळात सुशिक्षित तरुण राजकारणात येण्यासाठी कचरतात.परंतु काही तरुणांनी राजकारण हे करिअरसाठी जाणीवपूर्वक निवडलं आणि त्यात चांगले यश मिळवले. कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे अशा तरुणांपैकी एक.

महेश शिंदे हे कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत असून 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रीया पार पडली. आता 23 नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहे.

एका शिक्षिकेच्या पोटी जन्म घेतलेले महेश शिंदे हे देखील स्वतः उच्चशिक्षित आहेत. त्यांची बहीण मोठी डॉक्टर असून एक भाऊ साधा शेतकरी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा कौटुंबिक पाठबळ नसताना महेश शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर आणि तांत्रिक माहितीवर त्यांनी डिस्टिलरी सुरू केली. हळूहळू जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांचा प्रवेश झाला आणि ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस मधून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.

Koregaon Assembly Election 2024 MLA Mahesh Shinde Biography

अध्यात्मिक प्रभाव

त्यानंतर काही वर्ष महेश शिंदे अज्ञातवासात होते. अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला आणि ते कोल्हापूरच्या कणेरी मठातील अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांचे शिष्य बनले. तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात प्रचंड बदल झाला आणि शांत आणि संयमी महेश शिंदे हे नव्यानेच सातारा जिल्ह्याचे राजकीय पटावर दाखल झाले. 2014 पासून त्यांनी कोरेगाव तालुक्यात भक्कम बांधणीला सुरुवात केली. तरुणांचे संघटन उभारले. सामाजिक कामावर भर दिला आणि 2019 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर त्यांना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच लढतीत त्यांनी राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव केला.

एकनाथ शिंदे यांना पाठींबा

शिंदे यांच्या पहिल्याच कारकिर्दीत शिवसेनेत पक्षीय घामासान झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडात महेश शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. आणि महेश शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनले.

कोरोनाच्या काळात लक्षवेधी काम

राजकारणाच्या पटावर उलट सुलट खेळी सुरू असतानाही महेश शिंदे यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाकडे आणि कल्याणाकडे विशेष लक्ष दिले. विशेषतः कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले काम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गाजले. कोरोनाच्या काळात तालुक्याच्या खेड्या पाड्यात त्यांनी तळ ठोकला. स्वखर्चातून अनेक ठिकाणी कोरोना हॉस्पिटल उभारली. हजारो लोकांवर वेळीच उपचार होण्यात महेश शिंदे यांचा मोठा वाटा आहे.

कोरेगाव शहरासाठी 700 कोटींचा निधी

दुष्काळी भागासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकडे महेश शिंदे यांचा विशेष कल राहिलेला आहे. जीहे कथापूर पाणी प्रकल्पाला त्यांनी प्राधान्य दिले. दुष्काळ प्रबळ खटाव तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. सध्याच्या महायुती सरकारने देखील या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिले आहे. महेश शिंदे यांच्या माध्यमातूनच कोरेगाव शहरासाठी 700 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे या माध्यमातून शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम, बाजारपेठ, तिळगंगा रिवर फ्रंट, जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल आणि नाट्यगृह यांची उभारणी होणार आहे.

संपूर्ण मतदारसंघासाठी शेकडो कोटींचा निधी

खंडाळा- शिरोळ राज्य महामार्गासाठी महेश शिंदे यांनी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. तसेच देऊळ रहिमतपूर या मार्गासाठी 139 कोटी रुपयांचा निधी शिंदे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. संपूर्ण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी महेश शिंदे आणि तब्बल 3500 कोटी रुपयांचा निधी मिळविला आहे. या निधीमधून प्रत्येक गावातील विकास कामांकडे महेश शिंदे आणि बारकाईने लक्ष दिले आहे. रस्ते बांधणी तसेच पिण्याचे पाण्याची सुविधा, विजेची उपलब्धता आणि सभागृहे उभारण्याकडे विशेष भर देण्यात आला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात पानंद रस्ते उभारणीसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात महेश शिंदे यांना यश आले आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घरापासून शेतापर्यंत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होत आहे.

विकासकामे राबवणारा आमदार

आमदारकीच्या पहिल्याच प्रयत्नात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकास कामे राबवणारे एकमेव आमदार म्हणून महेश शिंदे यांची सातारा जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची कोरेगाव मधील नागरिक आजही आठवण काढतात. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाकडे महेश शिंदे आणि विशेष लक्ष दिले त्यामुळे त्यांना काँक्रीट आमदार असेही यांच्या मतदारसंघात गमतीने म्हटले जाते.

पुन्हा होणार शशिकांत शिंदे यांच्याशी सामना

2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महेश शिंदे यांना कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. त्यांची लढत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्याशी होत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या गटाला ओहोटी लागली आहे. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी महेश शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महेश शिंदे यांच्यासाठी तुलनेने सोपी असल्याचे सातारा जिल्ह्यातील राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+