लव्ह, सेक्स अन् धोका, पुणे बलात्कार प्रकरणाला धक्कादायक वळण; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
पुण्याच्या कोंढवा परिसरात एका २५ वर्षीय तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीने शहरात खळबळ उडवली होती. तिने एका अनोळखी कुरिअर बॉयने घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तरुण दुसरा कोणी नसून तिचाच प्रियकर होता, आणि हा प्रकार वैयक्तिक मतभेदातून घडल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रेमसंबंधात बिघाड, आणि खोटी फिर्याद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गेल्या दोन वर्षांपासून कोंढव्यातील एका सोसायटीत आपल्या भावासोबत राहत होती. ती आयटी कंपनीत नोकरी करते. तक्रारीनुसार, घटना घडली तेव्हा ती घरी एकटी होती. त्या दिवशी संध्याकाळी एक तरुण कुरिअर घेऊन आला आणि खोलीत घुसून अतिप्रसंग केल्याचा आरोप तिने केला. पण तपासात समोर आलं की, संबंधित तरुण तिचा दीर्घकालीन प्रियकर होता.
फिजिकल रिलेशनवरून वाद, त्यातून फिर्याद
त्या दिवशी दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरून वाद झाला होता. तरुणीने मासिक पाळीचं कारण देत नकार दिला, पण तरुणाने जबरदस्ती केली आणि त्यांच्यात अर्धवट संबंध झाले. त्यानंतर रागाच्या भरात तरुणीने पोलिसांत जाऊन 'कुरिअर बॉय'ने बलात्कार केल्याची बनावट तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, दोघांमध्ये यापूर्वीही शारीरिक संबंध होते, असं तपासात निष्पन्न झालं आहे.
सुरक्षारक्षकांची दिशाभूल करण्यासाठी 'कुरिअर'ची थाप
दोघांचे कुटुंब एकमेकांना ओळखतात. तरुण अनेकदा तिच्या घरी गेला होता. मात्र, सोसायटी गेटवर रजिस्टरमध्ये नाव नोंदवावे लागते, म्हणून तो प्रत्येकवेळी स्वत:ला 'कुरिअर बॉय' सांगून आत येत असे. सुरक्षा रक्षक फोन करत असत, आणि तरुणी त्याला दुजोरा देत असे. अशाच प्रकारे तो त्या दिवशीही घरात शिरला होता.
अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे तपास वेगवान
ही घटना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी घडली. त्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव होता. तब्बल २०० पोलिस अधिकाऱ्यांची टीम या प्रकरणाच्या तपासात लावण्यात आली होती. शेकडो सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि कुरिअर कंपन्यांची माहिती तपासण्यात आली. शेवटी आरोपी एका लग्न समारंभातून अटक करण्यात आला.
म्हणूनच बनावट तक्रारी गंभीर!
पोलिस तपासातून हे स्पष्ट झालं की, तरुणीनेच खोटी गोष्ट रंगवली होती. तिने आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील संबंधित डेटा डिलीट करून पुरावे पुसले होते. पण तिला वाटलं नव्हतं की पोलिसांकडून इतका सखोल तपास केला जाईल.
खरा धक्का: लव्ह, सेक्स आणि धोका
ही संपूर्ण घटना 'लव्ह, सेक्स अँड धोका' या धर्तीवर असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पोलिसांकडे बनावट तक्रार करून एका व्यक्तीचं आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ, संसाधने आणि ऊर्जा वाया गेली. अशा गंभीर प्रकरणांमध्ये बनावट तक्रारी दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications