Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शक्तिपीठ महामार्गावरुन एकनाथ शिंदेंवर कोल्हापूरकर नाराज, कुणाल कामराचं गाण वाजवून करणार विरोध

Shakti Peeth Highway, Eknath Shinde- Kunal Kamra : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो, असे आश्वासन दिले होते. तसेच शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर कर्जमाफी देणार असल्याचे देखील आश्वासन दिलं होतं ‌. पण आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने घुमजाव केला आहे.

या पार्श्वभूमी वर सर्किट हाऊस मध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीमध्ये बोलताना समितीचे समन्वय गिरीश फोंडे म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन सरकार व पक्षाशी गद्दारी केली तेव्हा जनतेने हलकेपणाने घेतले. पण आता शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे व कर्जमाफीचे आश्वासन देऊन देखील न पाळता शेतकऱ्यांची गद्दारी करत असतील तर कोल्हापुरातील शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही.

ekanath shinde

महाराष्ट्रात मागीलवर्षी 2 हजार 900 शेतकरी आत्महत्या केलेल्या असताना विजय मेळावा घेणे, म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. 12 मार्चच्या मुंबई मोर्चा रोजी देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकू देणार नाही. कुणाल कामरा चे गाणे लावून एकनाथ शिंदे यांचा विरोध होईल, असा इशारा देण्यात आला आहे"

उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले," महाराष्ट्र युती सरकार हे सातत्याने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करत आहे. या दडपशाहीला कोल्हापुरातील जनता भीक घालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द करून व कर्जमाफीचा आदेश घेऊनच एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा. अन्यथा कोल्हापुरी हिसक्याला सामोरे जावे, म्हटलं आहे.

"गोकुळ संचालक प्रकाश पाटील म्हणाले,"निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देत त्यांचे पालन करणे म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे पतन आहे. महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये खडखडाट असताना 86 हजार कोटी कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग कशाला पाहिजे. या पैशातूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+