कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत'आजपासून सेवेत, जाणून घ्या किती आहे तिकिट.. वेळापत्रकही समजून घ्या
Kolhapur-Pune Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल-परवाच दुरदृष्यप्रणालीद्वारे दहा वंदे भारत रेल्वेंचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यात भर म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सहा वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ होणार आहे. त्यातील एक वंदे भारत रेल्वे महाराष्ट्राला मिळणार आहे.
सहा वंदे भारत ट्रेनमध्ये कोल्हापूर-पुणे 'वंदे भारत' ट्रेनचा समावेश आहे. ही ट्रेन कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणार आहे. आज सोमवारपासून आठवड्यातून तीन वेळा वंदे एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन पद्धतीने वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.व्ही.सोमण्णा यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता कोल्हापुरच्या शाहू महाराज टर्मिनसवरुन वंदे भारतचा प्रवास सुरू होणार आहे.

या दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा
कोल्हापूर-पुणे वंदे भारत ट्रेनची काही दिवसांपूर्वीच चाचणी पार पडली होती. त्यानंतर आज कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन दर सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापूर स्थानकावरून सुटेल. दुपारी दीड वाजता ही गाडी पुणे स्टेशनवर पोहोचेल. त्यानंतर ती पुणे येथून ही रेल्वे दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी दुपारी ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार आहे ती सायंकाळी 7:40 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानाकावर पोहचणार आहे.
किती आहेत दर
कोल्हापूर-पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी 1 हजार 160 रुपये तर एक्झिक्युटिव्हसाठी 2 हजार 5 रुपये असे तिकिट दर असतील. वंदे भारतमुळं कोल्हापूर आणि पुणेकरांचा प्रवास सुस्साट होणार असून ते पुण्याला 5 तासांत प्रवास पूर्ण होणार आहे.
अशा आहेत वेळा..
कोल्हापूर पुणे वंदे भारत सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरातून निघेल त्यानंतर मिरजमध्ये 9 वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत 9.42, कराड 10.07, सातारा 10.47 आणि पुण्यात दीड वाजता पोहोचणार आहे. पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल. साताऱ्यात 4.37 कराड 5.25, किर्लोस्करवाडीत 5.50, सांगली 6.18, मिरजेत 6.40 तर कोल्हापुरात 7.40 ला पोहोचेल अशी माहिती समोर आली आहे.
वंदे मेट्रोचे "नमो भारत रॅपिड रेल" असे नामकरण
वंदे मेट्रोचे भारतीय रेल्वेने अधिकृतपणे "नमो भारत रॅपिड रेल" असं नामकरण केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या बरोबर एक दिवस आधी हे नामकरण करण्यात आलं आहे. ही रेल्वे देशातील पहिली रॅपिड रेल्वे असेल. गुजरातमध्ये देशातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेची आजपासून सेवा सुरु होणार आहे. नमो भारत रॅपिड रेल्वे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असलेल्या भुजला, अहमदाबादला, राज्याच्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक, 360 किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तासांत जोडणार आहे. ही रेल्वे ताशी 110 किलोमीटर वेगानं धावण्याची क्षमता ठेवते.












Click it and Unblock the Notifications