Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठ' नामविस्ताराविरोधात जनतेचा एल्गार; आंदोलकांनी थेट यांना दिला इशारा

Kolhapur News-Shivaji University : 'आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ' असा नारा देत कोल्हापुरातील शिवप्रेमी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज (दि.28) शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराविरोधात एल्गार पुकारला आहे.

विद्यापीठ प्रांगणात त्यांनी 'शिवाजी विद्यापीठ आमचा अभिमान, "जय भवानी जय शिवाजी', असा जोरदार जयघोष केला. विद्यापीठाचा नामविस्तार कोणत्याही परिस्थितीत करू देणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी केला.

विद्यापीठातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर सकाळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यापीठ सेवक संघ, विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा झाले.

सुरुवातीला शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर करत उपस्थितांचा जोश वाढविला. त्यानंतर उपस्थितांनी 'आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ', 'आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ', 'नको नको नामविस्तार नको', अशा दहा मिनिटे घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

Kolhapur News

यांचा होता आंदोलनात सहभाग

या आंदोलनात विजय देवणे, आर. के. पोवार, व्यंकाप्पा भोसले, शिवाजीराव परुळेकर, संभाजीराव जगदाळे, भारती पोवार, बाबूराव कदम, क्रांतिकुमार पाटील, भैया माने, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, चेतन नरके, प्रताप पाटील, उदय नारकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सचिन चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, मिलिंद भोसले, डी. आर. मोरे, व्ही. एम. पाटील, आर. के. शानेदिवान, डी. यू. पवार, आनंद खामकर, अवधुत साळोखे, टी. एस. पाटील, रमेश पोवार, सरलाताई पाटील, संदीप देसाई, प्रवीण पाटील, हर्षल सुर्वे, रवी जाधव, श्वेता परुळेकर, अभिषेक मिठारी, शुभम शिरहट्टी, बाबासाहेब उलपे, विकास मोहिते, वसंतराव मगदूम, अनिकेत घोटणे आदी मान्यवरांचा सहभाग होता.

नाव कायम राहण्यासाठी लढा

'शिवाजी विद्यापीठ' हे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. विद्यापीठ स्थापनेवेळी शिक्षणतज्ज्ञ आणि त्यावेळचे सर्वमान्य लोकप्रतिनिधींनी या विद्यापीठाला 'शिवाजी विद्यापीठ' या दिलेल्या नावात आम्ही कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कारणाने, कोणत्याही निमित्ताने बदल करू देणार नाही. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहण्यासाठी प्रामाणिकपणे लढू आणि हेच नाव काम ठेवण्यासाठी कटिबद्ध राहू,' अशी शपथ उपस्थित लोकांनी घेतली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+