Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अबब.! निवडणुकीच्या धामधुमीत 'या' जिल्ह्यात गोवा बनावटीची लाखोंची दारु जप्त, पोलिसांनी कसा रचला डाव

Kolhapur Crime : ऐन निवडणुकीच्या काळात कोल्हापुरात दारुचा मोठा साठा सापडला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने कारवाई करत 7 लाख 40 हजारांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे.

साडे सात लाख किंमतीची गोवा बनावटीची दारु जप्त

शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अवैध दारुची विक्री व वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाई करणेसाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. अवैध दारुवर कारवाई करणेसाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेला पार्ले, (ता. चंदगड) गावच्या हद्दीत जुवाव सालदाना यांचे मालकीचे पत्र्याचे शेडचे बाजूला उघडयावर गोवा बनावटीचे दारुचा साठा केल्याची गोपनीय माहिती मिळाली.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथकाने पार्लेतच छापेमारी केली. छापेमारीत शिवाजी धाकलू गावडे (वय 38, रा. पार्ले, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याकडे जवळपास साडे सात लाख किंमतीची गोवा बनावटीची दारु मिळून आली.

Kolhapur Crime

कर चुकविण्यासाठी दारु आणली गेली

अधिक चौकशी केली असता त्याने सदरची दारु महाराष्ट्राचा कर चुकविणेसाठी गोवा राज्यातून विक्री करणेसाठी आणली असल्याची कबूली दिली. सदरची दारु कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आली असून आरोपीविरुद्ध चंदगड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतिश जंगम, प्रकाश पाटील, दिपक घोरपडे, सागर चौगले व सुशील पाटील यांचे पथकाने केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+