कोल्हापूर हादरलं ! बोलेरो-ट्रकची धडक, एकाच गावातील तीन युवक जागीच ठार, 4 गंभीर जखमी
Kolhapur Accident : कोल्हापूर तालुक्यातून अतिशय धक्कादायक व मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बोलेरो कार व ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात बोलेरोमधील तीघे जागीच ठार झाले आहेत. तर अन्य पाच जण गंभीर जखमी आहेत. एकाच गावातील तीन तरुण ठार झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान या भीषण अपघात झाला. ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात सोळांकुर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर झाले आहेत. या अपघातात सोळांकुर गावातील शुभम चंद्रकांत धावरे (28), आकाश आनंदा परीट (23) आणि रोहन संभाजी लोहार (24) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चौघे जण गंभीर जखमी झालेले आहेत.

गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा
भीषण अपघातामुळं ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात ट्रक ड्रायव्हरनं भरधाव गाडी चालवत अपघात केला. अपघातानंतर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता त्यानं घटनास्थळावरुन पळ काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रकचालकाने घटनास्थळावरून काढला पळ
स्थानिक लोकांनी सांगितले की, हा भीषण अपघात झाला. ट्रकचालकाने भरधाव वाहन चालवत बोलेरोला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याने मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. लवकर मदत मिळाली असती तर युवकांचा प्राण वाचवता आला असता. पण त्यांना योग्यवेळी मदत झाली नाही.












Click it and Unblock the Notifications