Kojagiri Purnima :कोजागरी पौर्णिमा खास उपाय आणि मंत्र, आपल्या प्रियजनांना खास मराठीत शुभेच्छा संदेश
Kojagiri Purnima 2024 Wishes : आज कोजागरी पौर्णिमाची रात्र आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी आकाशातून अमृतवृष्टी होते. देवी लक्ष्मी आणि चंद्राच्या उपासनेचा हा दिवस 'कोजागरी पौर्णिमा' आणि 'रास पौर्णिमा' म्हणूनही ओळखला जातो. शरद पौर्णिमेचे व्रत केल्याने सुख-संपत्ती प्राप्त होते
असे मानले जाते की, चंद्राची किरणे तुम्हाला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात . कोजागरी पौर्णिमाच्या रात्री लक्ष्मीची आणि इंद्राची पूजा केली जाते. चंद्राला मसाला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्राची पूजा करून दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. कोजागरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर आज बुधवारी आहे. या दिवशी पती-पत्नीने मिळून पूजा करावी, असे केल्याने नाते मजबूत होते आणि लोकांमध्ये प्रेम वाढते.

कोजागरी पौर्णिमाचा मंत्र -
माँ लक्ष्मी मंत्र: ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीध प्रसीध ओम महालक्ष्मीय नमः।
चंद्रदेव मंत्र: ॐ पुत्र सोमय नमः।
श्री कृष्ण रास लीला मंत्र:
ॐ स्वच्छ कृष्णाय गोपीजनवल्लभय स्वाहा.
कोजागरी पौर्णिमेला खास उपाय
खीर तयार करा आणि चांदण्या रात्री देवाला अर्पण करा आणि नंतर कुटुंबासह प्रसाद म्हणून सेवन करा. या दिवशी चंद्रासमोर बसून लक्ष्मी आणि चंद्रदेव यांचे ध्यान करावे. गरजूंना अन्न आणि वस्त्र दान करा, यामुळे पुण्य मिळते.
या शुभ दिवशी आपल्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवा
त्यात गोडवा दुधाचा
विश्वास वाढू दे नात्याचा
त्यात असू दे गोडवा साखरेचा...
कोजागरीच्या हार्दिक शुभेच्छा
दूध हे केशरी, कोजागरीचे खास
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात
परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात असाच वाढावा गोडवा
आयुष्यभर मिळावी आपली साथ... कोजागरीच्या मनपूर्वक शुभेच्छा!
चला सर्वजण एकत्रित मिळून
कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी घेऊया चंद्राचा आशीर्वाद
जीवन होईल समृद्ध आणि आनंदी कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य,मांगल्य,समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!
देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमाचा उत्सव
तुमच्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येवो
लक्ष्मीमातेचा तुम्हाला आशीर्वाद मिळो
हा सण तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरो
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
DISCLAIMER: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. OneIndia Marathi लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पडताळणी करत नाही, त्यामुळे कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडित यांचे मत घ्या.












Click it and Unblock the Notifications