Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्धव ठाकरेंना धक्का, जाहीर केलेला उमेदवार CM शिंदेंसोबत जाणार; कोणत्या मतदारसंघात घडलाय प्रकार!

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये पक्ष बदलण्याच्या प्रक्रियेने देखील वेग घेतला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराने थेट उमेदवारी नाकारली. तर तातडीने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.

कोणत्या मतदारसंघात घडलाय प्रकार?

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या लढत पाहायला मिळणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली असून शिवसेना शिंदे जाहीर प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024

शिंदेंकडून प्रदीप जैस्वाल मैदानात

शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

एमआयएमकडून नासेर सिद्दीकी

या मतदारसंघात एमआयएमकोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयएमकडून नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी 'एक्स'वर पोस्ट करीत त्यांचे नाव जाहीर केले आहे.

तिरंगी लढत व अंतर्गत कलहामुळे घेतला निर्णय

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होणार होती. मात्र, आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात 2014 सारखी परिस्थिती म्हणजे एमआयएमचा उमेदवार निवडून येवू नये म्हणून माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी म्हटले आहे.

जाहीर केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर किशनचंद तनवाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+