Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! किरीट सोमय्यांची 72 मस्जिदीविरोधात तक्रार! यादीच जाहीर केली पण का? घ्या जाणून

Kirit Somaiya's complaint against 72 mosques : भाजपचे प्रवक्ते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईतील गोवंडी येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची आता राज्यभरात चर्चा होत आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात खुद्द त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत कारणही दिले आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर ध्वनी प्रदुषणविरोधी कायद्यानुसार निर्धारीत आवाजमर्यादेतच वाजवावे असे सांगितले होते. ध्वनीक्षेपक किती आवाजात वाजवावे यासंबंधी कायदा आहे त्याचे पालन करणे आणि ध्वनी प्रदुषण कमी करणे हे यामागील उद्दीष्ट आहे.

Kirit Somaiya s complaint

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर ध्वनी प्रदुषणविरोधी कायद्यानुसार निर्धारीत आवाजमर्यादेतच वाजवावे तसे न केल्यास दिलेली परवानगी रद्द केली जाईल असे म्हटले होते. यासंदर्भात टीव्ही 9 भारतवर्षने वृत्त दिले आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी जवळपास 72 मस्जिदमधील ध्वनीक्षेपकावर आक्षेप घेतला आहे आणि पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

काय आहे किरीट सोमय्या यांची पोस्ट?

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक्सवर एक पोस्ट केली त्यात त्यांनी लाऊडस्पीकरसंदर्भात मजकूर लिहिला आहे व म्हटले आहे की, " 72 मशीद/ध्वनीक्षेपक.. शिवाजी नगर गोवंडी मुंबईय... रोज भोंगे जोरात वाजत आहे. लाऊडस्पिकर/भोंग्याची परवानगी एकाही मशिदीने घेतलेली नाही. काल शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आम्ही तक्रार केली, उद्यापासून कारवाई होणार आहे.

किरीट सोमय्यांनी दिली सोशल मीडियावर यादी

किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची एक प्रत त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यानुसार, अलभदिना मस्जिद व मदरसा आता-ए- रसुल तालीमुल कुराण, रजा जामा मस्जिद, अंजुमन आशिकाने रसुल मस्जिद (देवबंद). फैजूल रसूल जामा मस्जिद (सुन्नी), बिस्मिल्ला जामा मस्जिद (सुन्नी), शाहीन नुरानी सुन्नी मस्जिद (मुस्लिम सुन्नी बरेलवी),अंजुमन इस्लाहे उम्मत मस्जिद (देवबंद), गौस ए आजम मस्जिद (मुस्लिम सुन्नी), मदने मस्जिद व मदरसा एज्युकेशन ट्रस्ट (देवबंद), मदरसा अरेबिया अशफुल उलुम बाबारेहमत मस्जिद (देवबंद) आदींची नावे आहेत.

राज ठाकरेंनीही उठवला होता मुद्दा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोग्यांचा मुद्दा उठवला होता. त्यावेळी त्यांनी भगवे वस्त्र परिधान करुन सभाही घेणे सुरु केले होते. तेव्हाचा हा राजकीय स्टंट होता असा आरोपही त्यांच्यावर झाला पण ते त्यांच्या भुमिकेवर आजही ठाम आहेत, असे बोलले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+