Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

किरीट सोमय्या यांचा भाजपाला घरचा आहेर, पक्षाने दिलेली 'ती' ऑफर धुडकावली

मुंबई: आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. त्यासाठी नेते पदाधिकारी यांच्यावर विविध जबाबदार-या सोपवल्या जातात. भाजपात ही आता नेते आणि पदाधिका-यांच्या निवड केली जात आहे. अशातच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

पक्षाकडून किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली होती. मात्र सोमय्या यांनी हे पद घेण्यास स्पष्ट नकार देत भाजपालाच घरचा आहेर दिला आहे. सोमय्या यांनी एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नकार कळवला आहे. तसेच त्यांनी भाजपा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी खासदार रावसाहेब दानवे यांना ही पत्र देखील पाठवलं आहे. या पत्रामध्ये म्हटलं आहे की, एवढीच नाही, एवढी अपमानस्पद वागणूक देऊ नका, अशी विनंती केली आहे.

Kirit Somaiya

किरीट सोमय्या यांनी काय म्हटलं आहे पत्रात ?

'आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी,' असं म्हणत सोमय्यांनी आपली नाराजी पत्रातून बोलून दाखवली आहे.

दरम्यान'१८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजप-शिवसेनेची ब्ल्यू सी हॉटेल वरळी इथं संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितलं होतं. तेव्हापासून मी भाजपचा एक सामान्य सदस्य, कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मधल्या काळात मी ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी स्वीकारली होती. माझ्यावर तीनवेळा जीवघेणे हल्लेही झाले. तरीही मी ही जबाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे,' असं म्हणत सोमय्यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली.

'मी विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतोय आणि करत राहणार आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये,' असं म्हणत सोमय्यांनी विनंती सुद्धा केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+