Karwa Chauth 2024 wishes:करवा चौथनिमित्त हे प्रेमाने भरलेले शुभेच्छा संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवा

Karwa Chauth 2024 wishes : करवा चौथ हा भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचा सण आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला करवा चौथचा उपवास केला जातो. ज्यामध्ये विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करतात.या दिवसासाठी विशेष तयारी करावी लागते, त्यात सरगी हा महत्त्वाचा भाग आहे. यावर्षी हा सण 20 ऑक्टोबर 2024 आहे.

करवा चौथ हे इतर दिवसांच्या उपवासांपेक्षा खूप कठीण असतो. या दिवशी स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रदर्शन होईपर्यंत निर्जल व्रत करतात. म्हणजे या दिवशी अन्नपाणी सोडून देतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर पाण्याशिवाय उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून आणि पतीच्या हातचे पाणी पिऊन उपवास सोडतात. तुम्ही सुंदर मेसेजद्वारे या सुंदर उत्सवाला आणखी खास बनवू शकता. आम्ही तुमच्यासाठी असे प्रेमाने भरलेले संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.

Karwa chauth 2024 Marathi wishes

करवा चौथचे खास शुभेच्छा संदेश (Happy Karwa Chauth 2024)

तुम्हाला जोडीदाराकडून खूप प्रेम मिळावं
त्याच्या प्रेमाने तुमचं संपूर्ण आयुष्य खुलावं
तुम्ही असावे कायम सुखी-आनंदी हीच इच्छा
करवा चौथच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!

हा आनंदमय दिवस आपले जीवन भरु दे,
प्रेम आणि आनंद द्विगुणित होऊ दे,
करवा चौथच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!

करवा चौथ हा उत्सव आनंदाचा, चैतन्याचा
यानिमित्ताने तुमचे प्रेम, आनंद, वृद्धिंगत होवो
करवा चौथच्या आपणास हार्दिक शुभेच्छा...!

करवा चौथच्या या पवित्र दिवशी,
तुमचे तुमच्या पतीसोबतचे प्रेम दृढ होवो...
करवा चौथच्या आपणास शुभेच्छा...!

तूम्ही भेटलात आणि जीवनाला आकार आला
तूम्ही आयुष्यात आल्याने काळोखाचा प्रकाश झाला
तुमच्या येण्याने उजळून निघाले माझे संपूर्ण आयुष्य
तूम्हीच आणि तूम्हीच आहे आता माझ्या जगण्याचे उद्दीष्ट
करवा चौथच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

चंद्राचे तेज तुमच्या वैवाहिक जीवनात
आनंद आणि शांती देईल.
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा...!

करवा चौथचा हा शुभ दिवस असो
तुमच्या लग्नाचे बंधन नेहमीपेक्षा अधिक मजबूत असो!
करवा चौथच्या खूप खूप शुभेच्छा...!

करवा चौथ उत्सव आनंदाचा,चैतन्याचा,
प्रेम,आनंद,सहजीवन वृद्धिंगत होवो हीच इच्छा,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा...!

सुवासिनी मागते चंद्राकडे मागणे,
जन्मोजन्मी हेच मिळावे पती,
यासाठी करवा चौथ व्रत करते,
त्यांची सौभाग्यवती,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा...!

आजचा दिवस आहे तुमच्यासाठी खास,
लवकर घरी या माझ्यासाठी,
आतुरतेने वाट पाहते तुमची,
सफल होऊन दे करवा चौथची पूजा आमची,
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा...!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+