माझे अंघोळ करतानाचे व्हिडिओ, मुलीला उचलून नेण्याची धमकी; करुणा शर्मांचा पुन्हा आक्रोश, कोर्टात धाव!
Karuna Sharma Vs Dhananjay Munde : माजी मंत्री मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. कारण, पुन्हा एकदा करुणा शर्मा-मुंडे यांनी धनंजय मुंडेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.
अशातच, करुणा शर्मा यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. पोटगी संदर्भात मी लढाई जिंकल्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. माझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शेअर करू अशी धमकी दिली जात असून माझ्या मुलीचे किडनॅपिंग करण्याचे देखील षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
करुणा शर्मा यांनी कोर्टात आणखी काय केली मागणी?
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयात आता आणखी एक याचिका दाखल करत मोठी मागणी केली. त्यात म्हटले की, धनंजय मुंडेंची जवळपास 5 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यासंदर्भात आज न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ही संपत्ती कोणालाही खरेदी, विक्री करता येऊ नये, सगळ्या संपत्तीवर स्टे आणला जावा, अशी मागणी करुणा शर्मा यांनी याचिकेत केली.

काय म्हणाल्या करुणा शर्मा?
बांद्रा न्यायालयात घरगुती हिंसाचाराची या प्रकरणात आमची आज तारीख होती. आमच्या वकिलांनी तीन याचिका दाखल केलेल्या आहेत. ज्यामध्ये दोन लाख रुपये देण्याच्या निर्णयासंदर्भातील एक याचिका आहे. ज्या दिवशी कोर्टानं निकाल दिला, त्या दिवसापासून मला धमक्या दिल्या जात आहे, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
करुणा शर्मा पुढे बोलताना म्हणाल्या की, माझे खोटे व्हिडीओ टाकण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे. ज्यामध्ये मी नाहीये, मी या संदर्भात तीन वर्षांपूर्वी देखील तक्रार दिलेली आहे. मात्र या संदर्भात अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाहीये, आणि आता तर ज्या व्हिडीओत मी नाहीच, असे खोटे व्हिडीओ पोस्ट करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला सतत धमक्या येत आहेत, माझे अंघोळ करतानाचे व्हिडिओ टाकण्याची धमकी, माझ्या मुलीला उचलून घेऊन जाण्याची धमकी मला हे लोक दररोज व्हॉट्सअपवर धमक्या देत आहेत.
कोर्टातील केस मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव!
करुणा शर्मा पुढे बोलताना म्हणाल्या की, कोर्ट केस माघारी घ्या, तुम्ही धनंजय मुंडे यांची आमदारकी वापस घेण्यासंदर्भात जी याचिका दाखल केली आहे, ती माघारी घ्या, अशा धमक्या मला दिल्या जात आहेत. त्यासंदर्भात देखील मी कोर्टात धाव घेतली आहे.
मुंडेंच्या 500 कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रं माझ्याकडे
करुणा शर्मा पुढे बोलताना म्हणाल्या की, धनंजय मुंडेंची जी प्रॉपर्टी आहे, त्या पाचशे कोटी रुपयांच्या संपत्तीचे ओरिजनल कागदपत्रे माझ्याकडे आहेत. तर त्यांची 5 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यासंदर्भात आज मी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत ही संपत्ती कोणालाही खरेदी-विक्री करता येऊ नये अशी मागणी कोर्टाकडे केली आहे.












Click it and Unblock the Notifications