धनंजय मुंडेंचा राजीनामा 2 दिवसांपूर्वीच घेतला, फक्त घोषणा बाकी; अधिवेशनापूर्वीच मुंडे पर्व संपणार?

karuna Munde on Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात आलेले धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हे सूचक माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच धनजंय मुंडे राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.

करुणा मुंडे यांनी काय दावा केला

करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत. त्यांचे अन् धनंजय मुंडे यांचा वाद सुरू आहे. अशातच धनंजय मुंडे हे 3 मार्च 2025 रोजी राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. इतकेच नाही तर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी त्याची घोषणा केली जाईल, असाही दावा करुणा मुंडे यांनी केला.

karuna Munde on Dhananjay Munde

वाल्मीक कराड अटक अन् धनंजय मुंडेंवर टीकेची झोड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याला अटक झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह महायुतीच्या नेत्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राजकीय दबाव देखील वाढत आहे. विशेष करुन अंजली दमानिया यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. त्यांनी कृषी विभागात कसा घोटाळा केला, याबाबत त्यांनी माहिती दिली. त्यात आता करुणा मुंडे यांनी यासंदर्भात मोठा दावा केलेला आहे. धनंजय मुंडे यांनी आधीच अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला असून त्याची अधिकृत घोषणा तीन मार्च रोजी होणार असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंडेंनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला

याबाबत माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, मला शंभर टक्के माहिती मिळाली आहे की, दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे. उद्या शंभर टक्के राजीनामा होणार आहे. वाल्मीक कराड दोशी निघाला तर मी राजीनामा देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची घोषणा करतील, अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+