"मला जेवढं बदनाम करायचं ते करा! त्यांना माझा काटा रुततोय" -व्हायलर क्लिपप्रकरणी आव्हाडांचे उत्तर
jitendra awhad on viral audio clip : जितेंद्र आव्हाड यांच्या व्हायरल झालेल्या जुन्या क्लिबबद्दल त्यांनीच आज माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. "मला जेवढं बदनाम करायचं ते करा..याचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांचा काटा त्यांना रुततोय" असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांची कथित ऑडिओ क्लिप पोस्ट केली असून यात त्यांनी राजकारण्यांचे महिलांबद्दलचे मत बघा...असा मजकूर लिहिली आहे. या ऑडिओ क्लिपसंबंधित मनसेच्या दाव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी जे बोललो त्याला काहीतरी पार्श्वभुमी असेल ना..त्यावेळी मग त्या मुलीची तक्रार नोंदवली का गेली नाही. जी ब्लॅकमेलिंग केली गेली ती ज्याच्याशी झाली त्या व्यक्तीचे नाव मला घ्यायचे नाही ती व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीत आहे. टी -सीरीजच्या मालकासोबत ब्लॅकमेलिंग केले जात होते.
मी त्या व्यक्तीला करु नको म्हटलं..
जितेंद्र आव्हाड म्हणाले, बदलापूर प्रकरणातून सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही. माझी ऑडिओ क्लिप चालवून ते म्हणत असतील की, बदलापूर फिरवू तर आज ते एक्पोझ झाले आहेत ना..चार सहा वर्षांपुर्वीची ऑडिओ क्लिप..त्यात कुणीतरी ब्लॅकमेलिंग करतेय आता ती पलिकडे असलेल्या ज्येष्ठ नेत्यांकडे जाते तो ज्येष्ठ नेता मला फोन करतो आणि हे थांबव म्हणत असेल तर मी थांबव म्हणतो मी पैशांची ऑफर दिली का असा सवाल करत मी माझ्या भाषेत त्याला थांबव म्हणत होतो. हे कशाला करतो करु नको असे म्हटले होते.
माझ्या विरोधकांना काटा कुठेतरी रुततोय..
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला जेवढे बदनाम करायचे ते करा याचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांचा काटा कुठेतरी रुततोय. तो काढा काढायचा प्रयत्न आहे. उलट ते माझी हिमंत वाढवत आहे. मनसेने हा मुद्दा उचलू द्या किंवा कुणीही असे सुपारी उचलणारे खूप असतात. राज ठाकरे बदलापूरला आतापर्यंत का गेले नाहीत? किती दिवस झाले. मराठी माणसांचा अभिमान असलेले राज ठाकरेंचा हात त्या पीडित मुलीच्या आईच्या, वडीलांच्या डोक्यावरुन फिरायला हवा होता, कि घाबरु नका मी तुमच्याबरोबर आहे.
राज ठाकरे मिमिक्री आर्टीस्ट..
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी जर उद्या सांगितले की, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही मग ते काय तपासायला जाणार आहेत? राज ठाकरे कुणाचाही आवाज काढू शकतात, तुम्हाला माहीत आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टीस्ट आहेत त्यांनी माझा आवाज काढला असे म्हणू का मग...
काय आहे संदीप देशपांडेंचे ट्वीट?
राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि आव्हाडांमधील संवादाची क्लिप त्यांनी ट्विट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निषेध मोर्चातील शपथेवरून त्यांनी टोला देखील लगावला आहे. शपथ घेतली होती ना..असे म्हणत त्यांनी हे ट्वीट केले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांची कथित ऑडिओ क्लिप पोस्ट केली असून यात आव्हाड यांचा फोटोही दिसत आहे. या क्लिपखाली महिला सुरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ह्या राजकारण्यांचे महिलांबद्दलचे मत बघा...असा मजकूर आहे.
संदीप देशपांडेंचे प्रश्न
यापार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला, यामध्ये ते म्हणाले, "ही ऑडिओ क्लिप जुनी आहे. पण यातून कोणाची काय मानसिकता आहे ते दिसून येते. एखाद असे प्रकरण झाले असेल तर क्लिपमधील कोण व्यक्ती आहे, याचे खरेच जितेंद्र आव्हाडांसोबत बोलणे झालेले आहे का? आणि झाले असेल तर हे नेमकं प्रकरण काय आहे?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
(ही बातमी अपडेट होत आहे...)












Click it and Unblock the Notifications