जितेंद्र आव्हाडांवर पोलिसांचा वाँच; थेट घरात घुसून केले व्हिडीओ शूटिंग
जितेंद्र आव्हाड यांची स्वतःच्या घरात पत्रकार परिषद सुरु असताना गोपनीय विभागाचे पोलिस थेट त्यांच्या घरात घुसले. तेथे त्यांनी या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ शूटिंग केले. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातपले. जोपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी येत नाही तोपर्यंत या पोलिसांना सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारानंतर चांगलीच खळबळ उडाली.

नेमकं काय झालं?
जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू होती. त्यावेळी गोपनीय विभागाचे पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण करण्यात आलं. यावरून आता आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले? सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.
आव्हाडांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
जितेंद्र आव्हाड यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत घुसले. या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत..? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषद सुरू असतानाच आव्हाड भडकले. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन
आव्हाड यांनी पत्रकार परिषद थांबवून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. पोलिस माझ्या घरात काय करत आहेत, असा सवाल त्यांनी केला. सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असंही आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन करत या प्रकाराबाबत विचारणा केली. जोपर्यंत वरिष्ठ पोलीस इथे येत नाही तोपर्यंत यांना सोडणार नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली.












Click it and Unblock the Notifications