Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जितेंद्र आव्हाडांनी रुपाली ठोंबरेंविरोधात केला गुन्हा दाखल; ठोंबरेही कडाडल्या, म्हणाल्या...

शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांचे व्हाट्सअँप चॅट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठोंबरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर ठोंबरे यांनी पुन्हा आव्हाड यांच्याविरोधात मोर्चा उघडला. हे चॅट आव्हाडांचेच आहे आणि सोशल मिडिया म्हणजे काही न्यायालय नाही, असे म्हणत ठोंबरे यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले. यापूर्वी माझ्यावर ३२ गुन्हे दाखल आहेत, हा ३३ गुन्हा... असं म्हणत त्यांनी पुन्हा आव्हाडांना चॅलेंज केले आहे.

Jitendra Awad-Rupali Thombre dispute

कुणाविरुद्ध गुन्हा दाखल

रुपाली ठोंबरे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन जितेंद्र आव्हाड यांचे व्हाट्सअँप चॅटचे फोटो पोस्ट करण्यात आले होते. ठोंबरे यांच्या या प्रकारामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे म्हणत आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आव्हाडांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण आघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

काय होतं व्हाट्सअँप चॅटमध्ये

रुपाली ठोंबरे यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवलेली आव्हाडांची व्हाट्सअँप चॅट अशी होती...
उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज... मी पहिली तुझी भेट घेईल, नंतर मोर्चाकडे... मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर... पैसे लागले तर, मला फोन कर. पण मटेरियल तयार ठेव... तुझा फोन लागत नाहीए. सकाळपासून प्रयत्न करतोय. मोर्चात मुस्लिम व दलितांना गोळा करता आलं तर करा. पैशाची काळजी करु नका. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे. त्याला संधी द्यावी. मी सांगितलंय, कसं, काय, कुणावर बोलायचं... कसा मंत्री राहतो आणि अजित त्याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता...

काय म्हणाल्या ठोंबरे

गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, जितेंद्र आव्हाडांच्या चॅटचा तो स्क्रीनशॉट खरा आहे. जितेंद्र आव्हाड कसं काय सांगू शकतात की तो स्क्रीनशॉट त्यांचा आहे की नाही. कालच्या निषेध मोर्चातून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करण्यात आले. तो स्क्रीनशॉट खरा आहे. तो स्क्रीन शॉट जितेंद्र आव्हाडांचा आहे. कुठलाच आरोपी म्हणत नसतो हा स्क्रीनशॉट माझा आहे. त्या पुढे म्हणाल्या, मी मनसेत असताना माझ्यावर 32 गुन्हे दाखल झाले आहे. हे सर्व गुन्हे लोकांना न्याय देताना झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांची ही 33 वी केस आहे. त्यामुळे आपण बीडमध्ये भेटू. सोशल मीडिया काय कोर्ट नाहीये. मी बीडमध्ये जाईन आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा कायदेशीर फाडेल, असेही रुपाली ठोंबरेंनी सांगितले.

महाराष्ट्र अशांत करताहेत

ठोंबरे पुढे म्हणाल्या, "जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. अशा घाणेरडे केसेस तर आमच्यावर नाहीत. जितेंद्र आव्हाड सारखे राजकारणी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज बांगरसोबत का कॉन्टॅक्ट केला, ते काढा. ते स्क्रीन शॉट खरे आहेत. स्वतःच्या अकाउंटला फेक टाकून, ते फेक म्हणाले, म्हणून फेक होत नाही. जितेंद्र आव्हाड बालिश आहेत. त्यांना कायद्याचं ज्ञान नाही, असा आरोपही ठोंबरे यांनी केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+