खास PSI तपासात, पोलिस अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?; जितेंद्र आव्हाडांचा सवाल
Jitendra Awad on Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारच्या वतीने चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे.
यासाठी नेमण्यात आलेल्या SIT मध्ये एक प्रमुख आयपीएस अधिकारी हे बाहेरील असून उर्वरित सर्व अधिकारी हे वाल्मीक कराडची माणसे असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अशा वेळी हे अधिकारी वाल्मीक कराडला शिक्षा देतील की मदत करतील?, असा खडा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

संतोष देशमुख हत्याप्रकरण नेमक काय आहे?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर अनेक आरोप होत आहेत. वाल्मिक कराड हा हत्ये मागील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.
मात्र, यासाठी एसआयटीमध्ये एक प्रमुख आयपीएस अधिकारी हे बाहेरील असला तरी त्यांच्या हाताखाली दिलेले अधिकारी हे वाल्मीक कराडचे पोलिस असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराड सोबत या अधिकाऱ्यांचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील… pic.twitter.com/5BThMPUvng
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2025
फोटो शेअर करत आव्हाड नेमके काय म्हणाले?
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमु.ख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडे चा कार्यकर्ता आसल्या प्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराड चा आत्यंत खास माणुस आसुन गेले 10 वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय. असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications