अहो काय सांगता..! चक्क बायकोनेच दिली टीप अन् जयदीप आपटे असा अडकला जाळ्यात वाचा खास स्टोरी...
Jaydeep Apte : मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याप्रकरणात काल पोलिसांनी अटक केलेल्या जयदीप आपटेला न्यायालयाने आज 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटे हा शिल्पकार असून त्याने शिवरायांचा पुतळा बनवला होता. दरम्यान, पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया दिल्या जाऊ लागल्या. दुसरीकडे शिल्पकार जयदीप आपटेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु घटनेनंतर आपटे हा फरार झालेला होता. राहत्या घराला टाळे ठोकलेले होते. त्यामुळे पोलिसांकडून सातत्याने शोध घेतला जात होता. काल पोलिसांनी मोठ्या शिताफीने अखेर जयदीप आपटेला अटक केले. आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मालवण न्यायालयाने जयदीपला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जयदीपला कोठडी, चेतन पाटीलची कोठडी संपली
आज या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर पार पडली. यावेळी सरकारी वकील तुषार भनगे यांनी बाजू मांडली. तर आरोपीचे वकील गणेश सोहनी यांनीही त्यांची बाजू मांडली. या दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटे हा पोलीस कोठडीत राहणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील याची पोलीस कोठडी आज संपली आहे. त्यालाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. चेतन पाटीललाही 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कसा सापडला जयदीप पोलिसांना?
पोलिसांच्या पथकाने जयदीप आपटेला त्याच्या कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले. यापूर्वी मालवण पोलिसांचे पथक जयदीप आपटे याच्या घरी आले होते. तेव्हा घराला कुलूप होते. परंतु, बुधवारी जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटे याला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना करण्यात आले.
विरोधकांनी फडणवीसांचा राजीनामा मागितला होता
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. तेव्हापासून जयदीप आपटे हा फरार होता. अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतरही पोलिसांना त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि गृहमंत्रालयावर जोरदार निशाणा साधला होता. पोलिसांनी जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. जयदीप आपटे इतके दिवस हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे अलगदपणे पोलीसांच्या जाळ्यात अडकला.












Click it and Unblock the Notifications