गडकरींच्या भेटीनंतर ठरले; जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये येणार? बावनकुळे म्हणाले...

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाची पिछेहाट झाली. त्यानंतर पक्षात अस्वस्थता पसरली. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या बैठकीत जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याची मागणी पक्षातील काही नेत्यांनी केली. त्यानंतर जयंत पाटील दुखावले गेले. त्यात आज इस्लामपूर येथील जयंत पाटील यांच्या शिक्षण संकुलात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर जयंत पाटील हे भाजपात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.

Jayant Patil

कशा सुरु झाल्या चर्चा

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच होते. त्यात विधानसभा निवडणुकीत पक्षाला सपाटून मार खावा लागला. या निकालानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीत, अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घ्यावे, असा सूर थेट शरद पवारांसमोर मांडला. या सगळ्या प्रकारानंतर जयंत पाटील नाराज झाले. याच नाराजीनंतर ते शरद पवार गटाला रामराम ठोकतील अशा चर्चा सुरु झाल्या.

गडकरींची इस्लामपूर भेट

या सगळ्या प्रकारानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाँलाँजी या महाविद्यालयातील एका कार्यक्रमाला हजर होते. आ. जयंत पाटील यांच्या शिक्षण संकुलात मंत्री गडकरी हे प्रथमच येत असल्याने चर्चांना उधाण आले. या दौऱ्याला काही राजकीय संदर्भ आहेत का, याची चाचपणी सुरु झाली. जयंत पाटील व गडकरी यांचे स्नेहाचे संबंध आहेत. शिवाय दोन्हीही नेते आभ्यासू आहेत. त्यामुळे ही भेट चांगलीच चर्चेत आली.

काय म्हणाले बावनकुळे

गडकरी- जयंत पाटील भेटीनंतर जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र या सर्व चर्चांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपशेल नाकारले. ते म्हणाले की, जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा अफवा पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे. ते पक्षात येणार नाहीत. त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+