मनोज जरांगेंनी कालिचरण महाराजांना त्यांच्या 'स्टाईल'नं दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, टिकल्या- गंध लावतो
Jarange-Kalicharan Maharaj dispute- कालिचरण महाराज आणि मनोज जरांगे यांच्या सध्या वाकयुद्ध सुरु आहे. कालिचरण महाराज यांनी काल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत एक विधान केले होते. त्यावर विविध स्थरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. आता मनोज जरांगे पाटील यांनीही कालिचरण महाराजांना प्रतिउत्तर दिलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे
कालिचरण महाराजांच्या विधानावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बाबाला काही गरज नव्हती. आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो? हा टिकल्या, गंध लावतो, नथ घालतो, हा विचित्र प्राणी आहे. तू का बाबा आहे का हेंद्र्या..? असा प्रश्न करत जरांगे पाटील म्हणाले, बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे, ते त्यांचं काम आहे. आरक्षण काय, हे शिकवण त्यांचं काम नाही. माझ्या आई- बहिणीवर हल्ला झाला, होता तेव्हा तू कुठे गेला होता? असं म्हणत मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिले.
कालिचरण महाराजांवर केली टीका
जरांगे पाटील पुढे म्हणाले, हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येतं. तेव्हा आम्ही समोर येतो. तुला मी कधी बोललो नाही. तू वर आणि खाली वेगळा दिसतो. तुला कधी मी बोललो नाही. बाबा तुला आमचं दुःख कळायचं नाही. तुम्ही पाकिटं घेऊन किर्तनं करता. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. गरिबांच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतं ते विचार, हिंदूत अर्धा एकटा मराठा आहे. तू सुपारी घेतली असेल, असं म्हणत मनोज जरांगेंनी निशाणा साधला. आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो तू कोणतं हिंदुत्व चालवतो..? असा प्रश्नही जरांगेंनी विचारला.
काय म्हणाले होते कालिचरण महाराज
कालिचरण महाराजांनी काल जरांगे पाटलांचं नाव न घेता एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते. आता एक आंदोलन सुरु झालं होतं. ते तुम्हाला माहिती आहे का, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडायचं. अशी हवा होती त्या आंदोलनाची... अशी हवा... लाखो लोकं मुंबईत. टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोकं जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मला टेन्शन आलं की, त्यांनी आता जावं कुठे? कुठला त्यांचा नेता थडग्यावर चादर चढवतोय. आला रे चादरवाला आला रे आला. हे जाती-जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस आहेत, राक्षस... , असं म्हणत कालिचरण महाराज यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती.












Click it and Unblock the Notifications