आला रे आला, लाडक्या बहि‍णींचा हप्ता आला; यांनाच मिळाले पैसे, पटापट करा बॅलन्स चेक

महायुती सरकारला दुसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. लाडक्या बहि‍णींना आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे ९ हजार रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारीचा हप्ता कधी येणार, याबाबत चर्चा सुरु होती. याच चर्चेबाबत आज महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Ladki Bahin Yojana

काय म्हणाल्या तटकरे?

जानेवारीच्या हप्त्याबाबत आज मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे ट्विट केले. त्या ट्विटमध्ये तटकरे म्हणाल्या की, जानेवारीचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जानेवारीपर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. २६ जानेवारीपर्यंत पात्र सर्व महिलांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा झालेले असतील.

कुणाला मिळाले पैसे?

या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात कालपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांनी या योजनेतून स्वतः माघार घेतली, त्या महिला वगळता इतर सर्व महिलांना या योजनेतून पैसे मिळणार आहेत. आत्तापर्यंत सुमारे सव्वा कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

किती मिळाले पैसे?

महायुती सरकारने २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी, जानेवारीचा हप्ता हा १५०० रुपयांप्रमाणेच जमा झाला आहे. येत्या अर्थसंकल्पात वाढीव सन्मान निधीबाबत चर्चा होऊन त्यानंतर २१०० रुपये मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जानेवारीचे पैसे मिळून आत्तापर्यंत महिलांना साडेदहा हजार रुपये या योजनेतून मिळाले आहेत.

दोन दिवसांत सर्वांना पैसे

या योजनेचे पैसे बॅकेच्या खात्यात जमा होण्यास कालपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १.१० कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आता आज व उद्या मिळून येत्या दोन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+