काय म्हणाल काय कृतीला? पोलिसांनी आंदोलनकर्त्याच्या कंबरेत घातली लाथ, लोक म्हणतात हा वर्दीतला...
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर पोलिसांनी आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल चौधरी नावाच्या एका व्यक्तीच्या पत्नीने परस्पर दुसरे लग्न केले. या व्यक्तीने याबद्दल पोलिसांकडे मदत मागितली, मात्र पोलिसांकडून कोणतीही मदत मिळाली नाही असा आरोप त्याने केला. या नैराश्यातून त्याने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या काही वेळ आधी ही घटना घडली. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौधरी यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. याचवेळी एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या कमरेत लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गोपाल चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जेव्हा पोलिस आंदोनकर्त्यालाच लात घालतात....
— Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) August 15, 2025
पोलिस न्याय देत नाही म्हणून महिनाभर उपोषण करणाऱ्यांनी आज कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण DYSP अनंत कुलकर्णींनी आंदोलकाच्याच कमरेत लाथ घातली.
एवढी मग्रुरी, एवढा माज, एवढा निर्लज्जपणा, एवढं क्रोर्य, एवढा बेजबाबदारपणा केवळ वर्दीच्या… pic.twitter.com/gXayC0zenK
पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
या घटनेवर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना गोपाल चौधरी यांनी अंगावर रॉकेल टाकले होते. त्याच वेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरही रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी बळाचा वापर करणे आवश्यक होते. पोलिसांनी त्याच कारणासाठी बळाचा वापर केला असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.












Click it and Unblock the Notifications