Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Jalna Accident : जालन्यात भीषण अपघात! कार विहिरीत कोसळली, 5 ठार, 1 मृतदेह काढला बाहेर

Jalna Accident News : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात भीषण अपघात घडला असून भरधाव कार विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. राजुर-टेंभुर्णी रोडवरील गाडेगव्हाण फाटा इथं आज पहाटे ही घटना घडली. कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांसह पोलिस प्रशासनाने धाव घेतली, दरम्यान स्थानिकांकडून मदत कार्य सुरू असून आतापर्यंत एक मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. तर एकूण पाच जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Jalna Accident News

कार विहिरीत कोसळल्यानंतर प्रथमतः आत काही प्रवासी होते, त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. देळेगव्हाण इथले काही नागरिक टेंभुर्णी रोडवर मॉर्निंग वॉक साठी फिरत असताना त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात टेंभुर्णी कडे जात असलेली भरधावं कार रस्त्या लगतच्या विहिरीत जाऊन पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये यांचा समावेश

मृतांमध्ये फुलंब्री तालुक्यातील गुंगी गेवराई येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले, निर्मला सोपान डकले, भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथील पद्माबाई लक्ष्मण भामीरे, ज्ञानेश्वर लक्ष्मण भामीरे आणि गाडी चालक यांचा समावेश आहे. हे सर्वजण नातेवाईकांसह पॅरालिसिसच्या उपचारासाठी मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे जात होते. अपघाताची वेळ पहाटे पाचची असून, विहिरीची खोली सत्तर फूट व पाण्याची पातळी जवळपास साठ फूट असल्याने मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि एन.डी.आर.एफ.चे पथक शर्तीचे प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शोधकार्य सुरू आहे.

कारच्या माॅर्निग वाॅक करणारे जखमी

अपघाताच्या वेळी रस्त्यावर देळेगव्हाण इथले काही नागरिक रस्त्यालगत व्यायाम करत असताना, या गाडीने माजी सरपंच भगवान बनकर आणि त्यांच्या सहकाऱ्याला धडक दिली. त्यात बनकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मजालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रुग्णाला घेऊन जाताना दुर्दैवी अपघात!

अपघातग्रस्त आय २० कारमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. ही कार एका रुग्णास घेऊन सुलतानपूरकडे जात होती. क्रेच्या साहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कसा घडला अपघात?

अंदाजानुसार, कार वेगात असेल आणि या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले असावे, माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना या कारने धडक दिली असून यानंतर कार विहिरीत कोसळली असावी असे सांगण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+