Jalna Accident : जालना जिल्ह्यातील शहापूरजवळ बस-ट्रकची भीषण धडक, 6 ठार, 10 जण जखमी
Jalna Accident : जालना जिल्ह्यातल्या अंबड येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर यंत्रणा लगेचच कामाला लागली असून जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहापूर गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला, अपघातामध्ये वाहकासह 6 जण ठार झाले असून 10 जण जखमी झालेत जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बस ला जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक बसली , प्रत्यक्षदर्शी च्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण 24 प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आल आहे.
जालन्यात अंबडपासून दहा किमीवर वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण 10 जण जखमी झाल्याचं ताज वृत्त आहे आहेत. गेवराईहून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली. त्यानंतर हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती होती की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे. मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी होऊन त्याचा चक्काचूर झाला आहे. तर बसदेखील पूर्णपणे फुटली आहे.
गेवराईकडून बस अंबडकडे जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने, जालन्यावरुन समोरुन येणारा मोसंबीने भरलेला आयशर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे. बसमध्ये एकूण 20 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले. जखमींना अंबड शहरातील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications