जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा एकूण आकडा आला समोर! गाडीने हाॅर्न वाजवला असता तर वाचले असते जीव!
Jalgaon train accident : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक परधाडे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातातील मृत 12 प्रवाशांमध्ये 8 पुरुष, एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्वच मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले आहेत.
पाच मयतांची ओळख पटली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील 0257-2217193 या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. घटनास्थळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (जीएमसी) अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर दाखल होऊन मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच जीएमसीतील डीएनए चाचणीचे एक पथक घटनास्थळी दुसरे पथक शासकीय रुग्णालयात सक्रीय झाले आहे.

8 गाड्या दीड ते दोन तास खोळंबल्या
अपघातामुळे मुंबईकडून येणाऱ्या व जाणाऱ्या सुमारे 8 गाड्या दीड ते दोन तास खोळंबल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. यात पंजाब मेल, गीतांजली, हरिद्वार, कर्नाटक एक्स्प्रेस, सीतापूर सुपर फास्ट, बडनेरा नाशिक मेम गाडींचा समावेश होता.
#WATCH | Jalgaon train accident | Morning visuals from the incident spot
— ANI (@ANI) January 23, 2025
12 people died and several others were injured after the passengers of Pushpak Express were hit by Karnataka Express in Pachora of Jalgaon district. pic.twitter.com/2jtxE7ftuw
काय म्हणाला प्रत्यक्षदर्शी?
प्रत्यक्षदर्शी म्हणाला, 'आम्ही लखनऊहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (१२५३३) प्रवास करत होतो. दुपारी चारच्या सुमारास लोकांनी डब्यातून ठिणग्या निघताना पाहिल्या आणि डब्याला आग लागल्याची अफवा ट्रेनमध्ये पसरली. ट्रेनचा वेग कमी झाल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी चेन ओढली आणि चालत्या ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली. ज्यावेळी लोक ट्रॅकवर आले त्यावेळी कर्नाटक एक्सप्रेसने हाॅर्न जरी दिला असता तर पुष्पक एक्स्प्रेसमधील उड्या मारणारे लोक वाचले असते. निदान काही मृत्यू तरी टळले असते.
दरम्यान, कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस (12629) दुसऱ्या ट्रॅकवरून गेल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याच प्रवाशाने पुष्पक ट्रेनचा अपघात पाहिला होता. पुष्पक एक्स्प्रेस भुसावळ जंक्शन येथून बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता निघाली, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक ट्रेनला झालेल्या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications