पुष्पक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसने कसं चिरडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार
Jalgaon train accident : जळगावच्या पाचोरानजीक पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरली. प्रवाशांनी चैन ओढून पटापट रेल्वेतून उड्या मारल्या अन् समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने उडवल्याने तब्बल 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना अत्यंत भीषण असून या घटनेत जवळपास 40 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक बनली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून या संदर्भात प्रत्यक्षदर्शीने आपबिती सांगितली.
प्राप्त माहितीनुसार,या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी प्रवासी संदीप जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. ते म्हणाले, पुष्पक एक्स्प्रेस जळगाववरुन आली होती. तेवढ्यात कुणीतरी म्हणाले की आग लागली. आग लागली म्हटल्यावर लोकांनी पटापट उड्या मारल्या. समोरुन बंगळुरुहून येणारी दुसरी रेल्वे गाडी होती, त्या गाडीखाली लोक चिरडले गेले. किती लोक चिरडले गेले हे माहीत नाही. मात्र ब्रेक दाबल्यावर ज्या ठिणग्या उडाल्या त्यामुळे स्लीपर डब्यातील प्रवाशांनी उड्या मारल्या.

कुठे घडला अपघात
प्रत्यक्षदर्शी संदीप जाधव यांनी सांगितले की, परांडा स्टेशनच्या अलिकडे हा रेल्वे अपघात घडला. किती लोक जखमी झाले आहेत? किंवा किती लोक दगावले आहेत ते समजू शकलेले नाही, ही दुर्घटना घडली ते स्थान परांडा स्टेशनपासून सात ते आठ किमी अंतरावर आहे.
जळगाव जवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समजुन अतिशय दुःख झाले. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या सहवेदना कळवतो तसेच सर्व जखमींना लवकर बरे वाटो, ही प्रार्थना करतो.
— Governor of Maharashtra (@maha_governor) January 22, 2025
राज्यपालांकडून शोक व्यक्त
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केले. त्यांनी आपल्या भावना एक्सवर पोस्ट करुन व्यक्त केल्या. "जळगावजवळ दुसऱ्या रेल्वेच्या धडकेत काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे ऐकून अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकर बरे होण्याची कामना." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications