रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, गर्भवती महिला थोडक्यात बचावली, पहा व्हिडिओ
जळगाव : धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर गुजरात पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे. या स्फोटामध्ये रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली.
ही रुग्णवाहिका गर्भवती महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना एरंडोल रुग्णालयात घेऊन जात होती. मात्र स्फोट होण्याच्या काही मिनिटे आधी गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबीयांना रुग्णवाहिकेतून बाहेर उतरवण्यात आले होते, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

प्रत्यक्षात इंजिनमधून धूर निघत असल्याचे रुग्णवाहिका चालकाला दिसले, तो लगेच रुग्णवाहिकेतून बाहेर आला आणि काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी उभा राहिली. या स्फोटाचा व्हिडिओ समोर आला असून त्यात आगीचा फुगा अनेक फूट वर जात असल्याचे दिसून येत आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन पथक धटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. या घटनेनंतर काहीवेळ महामार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली होती.
Ambulance carrying pregnant woman blasts after catching fire in #Maharashtra's #Jalgaon
— Siraj Noorani (@sirajnoorani) November 13, 2024
Notably, no one was reported hurt as the driver's alertness made him notice the smoke coming out from vehicle, leading to quick evacuation of those on board. pic.twitter.com/7rQS4Fg2IO












Click it and Unblock the Notifications