जळगावात 'हिट अँड रन'चा थरार! रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवले, व्हिडिओ व्हायरल
जळगाव - मुंबई, पुण्यानंतर पुन्हा जळगावमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. एका रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला वेगाने येणाऱ्या कारने भीषण धडक दिली. हा अपघात एवढा गंभीर होता की, महिला कारच्या बोनटवर येऊन बाजूला आदळली. या घटनेचाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
महिलेला धडक देऊन कारचालक पसार
महाराष्ट्रातील जळगावत ही घटना घडली असून कॅमेऱ्यात कैद झालेल्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जळगाव येथे झालेल्या हिट-अँड-रन अपघातात वेगाने आलेल्या कारने महिलेला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला आहे.

काही सेकंदात घटना घडली
ही घटना अवघ्या काही सेंकदात घडली आहे. 26 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये जळगावमध्ये एक महिला रस्ता ओलांडत असताना अचानक कारने तिला धडक दिली, यात महिला उडाली. हा व्हिडिओ आज समोर आला आहे, परंतु ही महिला अपघातातून वाचली की नाही हे निश्चित नाही.
#BREAKING : Jalgaon : Hit and run again Speeding car hits woman with bike, thrilling accident caught on CCTV#Maharashtra #Jalgaon #cctv #HitandRun #accident pic.twitter.com/RTXm3eKX8R
— mishikasingh (@mishika_singh) August 13, 2024
असा घडला अपघात
- या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानुसार साधारणतः चाळीस ते पन्नास वयोगटातील एक महिला डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन रस्ता पार करत होती. त्यावेळी अचानक मध्ये दुचाकी तिच्या समोर आली. यामुळे तेथून मार्ग काढण्यास तिला विलंब झाला.
- याचवेळा दुचाकीच्या मागून एक कार भरधाव वेगात येत होती. या कारला दुचाकीआड असलेली महिला दिसली नसावी, त्यानंतर दुचाकीच्या बाजूने कार टर्न करत चालकाने ती पुढे नेली.
- पुढे नेत असतानाच अचानक कारचालकाला समोर महिला दिसली. परंतु कारचा वेग एवढा जास्त होता की, चालकाला ब्रेक लावणे शक्य होत नसावे. दरम्यान कारची धडक बसल्यानंतर महिला कारच्या बोनटवरुन बाजूला खाली कोसळली. यादरम्यान कारचालक घटनास्थळाहून पसार झाला, विशेष म्हणजे त्याने कार क्षणभरही थांबवली नाही.
घटनास्थळी लोकांची धावाधाव
अपघातानंतर कारचालकाने पलायन केले. त्यानंतर घटनास्थळी लोकांनी धावाधाव केली. दरम्यान या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची तयारीही करण्यात आली होती. पण ती महिला वाचू शकली की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.












Click it and Unblock the Notifications