विनोद तावडेंवर गुन्हा दाखल, भरारी पथक स्पाॅटवर, हाँटेलची कसून तपासणी...आता पुढे काय?

Maharashtra Assembly Election 2024- नालासोपाऱ्यातील विवांत हाँटेलमध्ये मंगळवारी भाजपचे नेते विनोद तावडे व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत प्रचंड राडा झाला. विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. विरार पूर्वच्या मानवेलपाडा येथील विवांत हाँटेलच्या रुम क्रमांक 404 मध्ये 9 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल सापडल्याचा दावाही केला जात आहे.

यानंतर पैशांच्या बंडलाचे फोटोही आता समोर आले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तब्बल साडेतीन तास विनोद तावडे यांना घेरलं होतं. आता यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान विनोद तावडे यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

Vinod Tawde

निवडणूक आयोगाची टिम स्पाँटवर

या घटनेनंतर काही वेळातच पोलिस यंत्रणा व निवडणूक आयोगाची यंत्रणा हाँटेल विवांतवर पोहोचली. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांना पत्रकारांनी याबाबत विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, नालासोपाऱ्याची घटना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि आमची निवडणूक यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ज्या स्पॉटवर ही घटना घडी तीथे आमची फ्लाईग स्कॉड पोहोचलेली आहे. तेथील परिसर आणि हॉटेलची पाहाणी आणि तपासणी फ्लाईग स्कॉड मार्फत केली जात आहे.

निवडणूक आधिकारी काय म्हणाले

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी म्हणाले, पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलीस यंत्रणेची प्राथमिकता आहे. त्याचबरोबर निवडणुकीसंदर्भातील कायद्यांचं काटेकोरपणे पालन होतय का, यावर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष आहे. आचारसंहितेच्या नियमानुसार सायलेंड पिरियडमध्ये उमेदवाराला त्याचा मतदारसंघ सोडून प्रचारासाठी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघात जाता येत नाही. कारण प्रचाराला बंदी असते. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीचे 48 तास हे सायलेंड प्रिरियड असतात. त्या काळात प्रचाराला बंदी असते. त्यामुळे या काळात दुसऱ्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणं अपेक्षित नाही, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+