पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहात महत्वाची माहीती
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ता.२८ शुक्रवारी विधानसभेत निवेदन दिले.पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी आणि ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपी वाचवण्यासाठी मदत केल्याचा आरोपावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात अनेक नव्या गोष्टी उघड केल्या आहेत.
अन् पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं
देवेंद्र फडणवीस यांनी ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने कसे बदलण्यात आले, यावरही स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलं नाही, असे दिसून आलं तेव्हा पोलिसांना स्ट्राईक झालं आणि काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मुलाचे आणि त्याच्या वडिलांचे डीएनए नमुने घेतले. हे डीएनएन नमुने रक्ताच्या सॅम्पलशी मॅच करुन पाहिले तेव्हा अल्कोहोल टेस्टसाठी देण्यात आलेले रक्त वेगळ्या व्यक्तीचं असल्याचं समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन ससूनमधील डॉक्टरांना अटक केली. या प्रकरणाशी संबंधित एका डॉक्टरने 3 लाख रुपये घेऊन रक्ताचे नमुने बदलल्याची कबुली दिली, असल्याचं ही फडणवीस यांनी सांगितले.
मुलाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा 110 चा स्पीड होता
पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसस करण्यात आलं. या अहवालात समोर आले की, ज्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलाने गाडीचा ब्रेक मारला, पोर्शे कार ज्या स्पीडला लॉक झाली तेव्हा गाडीचा वेग 110 किलोमिटर प्रति तास इतका होता. त्यामुळे संबंधित मुलगा हा अत्यंत वेगाने गाडी चालवत असल्याचं स्पष्ट झालं, असं फडणवीस यांनी सांगितले. अल्पवयीन आरोपी मुलाच्या घरापासून ते बारमध्ये जाईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. त्याने ज्या बारमध्ये जाऊन दारु पियली, तेथील सीसीव्ही फुटेज आणि बिलही जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याकडे कायदेशीर आणि तांत्रिक पुराव्यांची कोणतीही कमतरता नाही, असं फडणवीस यांनी सांगितले.
वडील आणि आजोबांवर किडनॅपिंगची केस लावली
"ज्युवेनाईल जस्टिस कायद्यानुसार आपला मुलगा प्रौढ नाहीय हे माहित असूनही वडिलांनी त्याला गाडी चालवायला दिली. म्हणून ज्युवेनाईल जस्टिस कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ज्या मॅनेजर्सनी त्यांना दारु दिली, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. या सोबतच आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घ्यायला सांगितला. तो पोलिसांकडे गेला, मी गाडी चालवत होता म्हणून सांगितलं. पण पोलिसांनी मान्य केलं नाही. आजोबांनी ड्रायव्हरला एक दिवस कोंडून ठेवलं. पण त्याने गुन्हा मान्य केला नाही. वडील आणि आजोबांवर किडनॅपिंगची केस लावली असून ही त्यांना अजूनही अटक आहे " असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अपघातानंतर लगेच मेडिकलला पाठवयाला पाहिजे होतं
अपघातानंतर मुलाला पहाटे 3 वाजता पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तेव्हा लगेच मेडिकलला पाठवायला पाहिजे होते. पण पोलिसांना त्यांनी सकाळी साडेआठला मेडिकलला पाठवले. नॉर्मली पोलीस अपघातानंतर 304 कलम लावतात, पण तेव्हा पोलिसांनी 304 अ कलम लावले. मात्र, नंतर वरिष्ठांनी 304 अ कलम लावले. त्याचा रेकॉर्ड केस डायरीत आहे. यावेळी आपले कर्तव्य न बजावणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications