Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पेपर लिक करतो, न्यूड फोटो पाठव! IIT मुंबईच्या विद्यार्थ्याच्या आयडीचा वापर, जेईई उमेदवाराला गंडा

IIT mumbai student id caard misused : आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याच्या आयडी कार्डचा वापर करुन जेईईच्या विद्यार्थ्यांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पेपर लिक करायचा असेल तर नग्न फोटोंची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एका विद्यार्थ्याने दावा केला आहे की, त्याच्या आयडी कार्ड फोटोचा गैरवापर करुन जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात आले.

IIT mumbai student id caard misused

सोशल मीडियावर आयडी शेअर केल्यानंतर काय घडलं...

ही धक्कादायक घटना घडल्यानंतर खळबळ उडाली असून एका विद्यार्थ्याने सांगितले की, त्याने आठ महिन्यांपूर्वी आयडी कार्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, परंतु आता बनावट प्रोफाइल तयार करून फसवणूक करण्यासाठी त्याचाच वापर केला जात आहे. या विद्यार्थ्याला जेव्हा एका मुलीने मेसेज करुन आयडी कार्डचा गैरवापर आणि फसवणुकीसंदर्भात माहिती दिली तेव्हा या प्रकरणाचे बिंग फुटले.

आयआयटी विद्यार्थी असल्याचे भासवून गंडा

मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित आरोपीने आपण आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असल्याचे भासवले आणि पेपर लीक करण्याचे आश्वासन देऊन जेईईच्या उमेदवारांना आमिष दाखवले. एवढेच नाहीतर यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे या बदल्यात त्यांच्याकडून नग्न फोटोही आरोपी मागत होता. फेक सोशल अकाऊंट यासाठी त्याने बनवले असावे अशी शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील बिंग फुटताच त्या व्यक्तीने त्याचे बनावट अकाउंट ब्लॉक केले, परंतु तो या विद्यार्थीनीला वेगवेगळ्या आयडीवरून वारंवार मेसेज करत राहिला.

आयआयटीचा विद्यार्थी आला भानावर

वनइंडियाच्या वृत्तात म्हटले आहे की, सोशल मीडियावर आपल्या आयडीचा गैरवापर होत असल्याचे लक्षात येताच आयआयटीचा विद्यार्थी भानावर आला. या विद्यार्थ्याने त्याची जुनी पोस्ट डिलीट केली आणि सोशल मीडियावरील लोकांना त्यांचा वैयक्तिक आयडी किंवा ओळखीशी संबंधित कोणतीही माहिती काळजीपूर्वक शेअर करण्याचा इशारा दिला. त्याने लिहिले की प्रेरणा देण्यासाठी पोस्ट केलेली एखादी गोष्ट इतक्या घृणास्पदपणे गैरवापर होऊ शकतो, असे मला कधीच वाटले नव्हते.

दरम्यान, त्याच्या पोस्टवर एका युजर्सने लिहिले की, इंटरनेट आता सुरक्षित ठिकाण राहिलेले नाही. लोक कोणत्या पातळीवर जाऊ शकतात हे दिसून आले. खूप भयानक आहे हे.... तर दुसऱ्या युजर्सने म्हटले की, काही लोक अशा प्रकारे एखाद्याच्या ओळखीचा गैरवापर कसा करतात हे खूप लज्जास्पद आहे. त्याच वेळी, काहींनी असा प्रश्नही उपस्थित केला की लोक अजूनही असे कसे मानतात की आयआयटी विद्यार्थ्यांना जेईई पेपर लीकमध्ये प्रवेश आहे, तर ते पूर्णपणे खोटे आहे. हा भ्रम अशा घोटाळेबाजांना बळ देतो. ही घटना पुन्हा एकदा ऑनलाइन ओळख संरक्षित करण्याचे आणि सोशल मीडियावर सावध राहण्याचे महत्त्व अधोरेखित करते. एखाद्याच्या ओळखीचा इतक्या प्रमाणात गैरवापर करणे हा केवळ गुन्हाच नाही तर समाजातील विश्वासाचा पायाही कमकुवत करतो. ऑनलाइन क्षेत्रात तरुणांनी स्वतःला सुरक्षित आणि जागरूक ठेवण्याची गरज आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+