प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर अपंगत्वाबद्दल खोटं बोलल्या ? यूपीएससीने नियुक्तीला दिले होते आव्हान
IAS Pooja Khedkar Mentally Disabled: महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील प्रशिक्षणादरम्यान आयएएसच्या मागण्यांबाबत एकापाठोपाठ एक अशी प्रकरणे समोर येत आहेत.

पुजा खेडकर यांच्या कार्यालयीन गैरवर्तनामुळे सरकारने त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे. परंतु, आता अपंगत्व प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यामुळे त्यांना यूपीएससी निवडीसाठी विशेष सूट मिळाली होती
खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा केला होता.जेणेकरुन यूपीएससी निवडीदरम्यान अपंगांना विशेष सवलत मिळावी. परीक्षेत कमी गुण मिळवूनही, या सवलतींमुळेच त्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या आणि त्यांना 821 ची रँक मिळवली. निवड झाल्यानंतर, केंदीय लोकसेवा आयोगाने त्यांना त्याच्या अपंगत्वाची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आलं. मात्र सहा वेळा ही खेडकर एम्स रुग्णालयात हजर राहिल्या नाहीत.
वैद्यकीय चाचण्यांना सतत टाळाटाळ!
22 एप्रिल 2022 रोजी दिल्लीच्या एम्समध्ये त्यांची पहिली नियोजित वैद्यकीय तपासणी होती, जी त्यांनी कोविड पॉझिटिव्ह असल्याचा दावा करून हजर राहिल्या नाहीत. त्यांची पुढील वैद्यकीय तपासणी, 26 आणि 27 मे रोजी दिल्लीच्या एम्स आणि सफदरजंग रुग्णालयात होणार होती, मात्र त्या चाचणीसाठी खेडकर हजर झाल्या नाहीत. खेडकर यांनी वारंवार वैद्यकीय चाचण्यापासून पळ काढला. 1 जुलै रोजी दुसरी वैद्यकीय तपासणी देखील त्या हजर राहिल्या नाहीत. पुन्हा त्यांनी 26 ऑगस्ट 2022 रोजी वैद्यकीय तपासणीसाठी सहमती दर्शवली होती, मात्र पुन्हा 2 सप्टेंबर रोजी महत्त्वाच्या एमआरआयसाठी हजर झाल्या नाहीत. त्यादिवशी त्यांची डोळ्याची चाचणी होणार होती. त्यानंतर त्यांनी कुठल्यातरी सेंटरमधून एमआरआय अहवाल मिळवला आणि त्या आधारे त्या जिल्हाधिकारी झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पूजा खेडकर यांचे जिल्हाधिकारी बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नियुक्तीला दिले होते आव्हान
प्रशिणार्थी जिल्हाधिकारी पुजा खेडकर यांनी कुठल्यातरी सेंटरमधून एमआरआय अहवाल मिळवत तो अहवाल सादर केला, जो केंद्रीय लोकसेवा आयोगाने नाकारला. यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्याच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) मध्ये आव्हान दिले, ज्याने 23 फेब्रुवारी 2023 रोजी त्याच्या विरोधात निर्णय दिला. असे असूनही, त्यांचे एमआरआय प्रमाणपत्र नंतर स्वीकारण्यात आले, ज्यामुळे त्यांची आयएएस नियुक्ती निश्चित झाली.
ओबीसी नॉन क्रिमीलेयरच्या कागदपत्रात ही गडबड
अपंग प्रमाणपत्रच्या दाव्याव्यतिरिक्त, खेडकर यांच्या ओबीसी नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राच्या दाव्यांमध्येही तफावत आढळून आली. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितले की, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 40 कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे. वडिलांची संपत्ती पाहता खेडकर यांचे ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र ही संशयास्पद आहे. दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती.












Click it and Unblock the Notifications