Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुलगीच नव्हे तर आता आई मनोरमा खेडकर अडचणीत, पिस्तूल धाकवून धमकावतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : प्रशिणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेले आरोप आणि गैरवर्तनच्या बातम्या ताज्या असतानाचा आता त्यांच्या आई मनोरखा खेडकर यांचा एक जूना व्हिडीओ व्हायरल झाला आहे . व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर ह्या पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Manorama Khedkar

प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या आईचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे कुटुंबाभोवती चालू असलेल्या वादांना आणखीनच खतपाणी मिळालं आहे. सत्ता आणि सत्तेच्या गैरवापरावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, मनोरमा खेडकर ह्या एका शेतक-यांना धमकावत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच नाही तर तिची आई देखील वादात आहे. पूजा खेडकरच्या आईचा हा जूना व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती हातात बंदूक घेऊन स्थानिक लोकांना धमकावताना दिसत आहे.मात्र, वन इंडिया मराठी या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही. पण वृत्तानुसार, असा दावा केला जात आहे की, व्हिडीओमध्ये पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर महाराष्ट्रातील पुण्यातील मुळशी तालुक्यात जबरदस्तीने जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांना पिस्तुलाने धमकावताना दिसत आहे.

आता या व्हिडिओवरून खेडकर कुटूंबाच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांच्या दमदाटीच्या व्हिडिओची आता तपासणी होणार असल्याची माहीती आहे. पोलीस या व्हिडिओची तपासणी करणार असल्याची माहिती आहे. पिस्तूलचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का? हे देखील तपासले जाणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+