11th admission : 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करताना अडचण येतेय का, मग जाणून घ्या संपूर्ण प्रकिया
11th admission Maharashtra News : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने खास सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांद्वारे संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाच्या वतीने करण्यात आलेला आहे.
दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी अजिबात गोंधळून न जाता शांतपणे प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे, पहिले दोन दिवस सराव सत्र असून त्याची विद्यार्थ्यांना मदत होईल, असे आवाहनही संचालनालयाने केले आहे. दरम्यान, 21 मे रोजी सुरू झालेली प्रक्रिया बंद झाली होती. ती आज 26 मे पासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याबाबत ही बातमी अतिशय सुंदर आहे.

दरम्यान, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांसह पालकांना करावा लागत आहे. काल व आज असे सलग दोन दिवसांपासून संपूर्ण साईड ही बंद पडल्याने विद्यार्थ्यांना हकनाक त्रास सहन करावा लागला. तर अजूनही बऱ्याच ठिकाणी साईड ओपन होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याच अनुषंगाने आपण आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सोईसाठी प्रवेश प्रक्रिया कशी करायची आणि कशा पद्धतीने अर्ज भरता येईल, याची माहिती देणार आहोत, चला तर जाणून घेऊया सर्व काही डिटेल्स...!
11th admission process कशी पार पडणार, जाणून घ्या प्रकिया
- https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- त्यानंतर राहण्याचे ठिकाण (तालुका) निवडा.
- संकेतस्थळाच्या दर्शनी पानावर 'न्यू रजिस्ट्रेशन' या पर्यायावर क्लिक करा
- उघडणाऱ्या पानावर नाव, मोबाइल नंबर, इमेल आयडी ही वैयक्तिक माहिती अचूक भरा
- इयत्ता दहावी परीक्षेचा बैठक क्रमांक, उत्तीर्ण होण्याचे वर्ष व शिक्षण मंडळ याची माहिती भरा
- आवश्यक प्रश्नांची उत्तरे देऊन सुरक्षित पासवर्ड तयार करून नोंदणी पूर्ण करा
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळालेला लॉगइन आयडी आणि अर्ज क्रमांक जपून ठेवा
अर्ज क्रमांक १ भरणे -
- लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून संकेतस्थळाच्या डॅशबोर्डवर लॉग इन करा
- तुमचे नाव, पत्ता, पालकांचे संपर्क क्रमांक, त्यांच्या व्यवसाय, इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरा
- तुमचा प्रवर्ग निवडा
डाक्युमेंट कसे स्कॅन करून अपलोड करावे..!
पुढील टप्प्यात आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील, त्यामध्ये खालील दिलेले प्रमाणपत्रांचा समावेश असणार आहे, याविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत...
- इयत्ता दहावीची गुणपत्रिका
- रहिवासी पुरावा
- जातीचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
- आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला
नोंदणी शुल्क कसे भरायचे?
क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा इतर ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी शुल्क भरा
अर्ज क्रमांक २ भरणे -
- अर्ज क्रमांक १ भरून झाल्यावर लॉक करा.
- पुन्हा एकदा लॉग इन करून सध्याचे राहण्याचे ठिकाण निवडा.
- तुमच्या पसंतीच्या महाविद्यालयांची यादी प्राथमिकतेनुसार म्हणजे सर्वात पसंतीचे महाविद्यालय सर्वात वर, या क्रमाने भरा.
- किमान एक आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालये निवडल्यावर अर्ज दाखल करा.












Click it and Unblock the Notifications