Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दीड हजारांचा हप्ता जमा झाला की नाही, कसं तपासायचं?

How to check installment of Ladki Bahin Yojana has been deposited in bank account : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याचे काय झाले हे योजनेतील लाभार्थी आता विचारत आहेत. पैसे आले की नाही आले तर ते कसे समजायचे आणि नाही आले तर कधी येतील ते कुठे पाहायचे हे प्रश्न अद्यापही कायम आहेत. सरकारकडून लाडकी बहिण योजनेचा हप्ता वितरणाची प्रत्येक महिन्यासाठी एकच ठोस तारीख नसल्याने ही समस्या येत आहे.

लाडकी बहिण योजनेचे कोट्यवधी लाभार्थी आता जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहे. आता वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील 2.47 कोटींहून अधिक महिलांसाठी सरकारने स्पष्टता अद्याप दिलेली नाही,पण संकेत असे आहेत की, जून 2025 चा 1500 रुपयांचा 12 वा हप्ता चार दिवसांच्या आत किंवा त्यापुढे काही दिवसांत वितरित केला जाईल. यामुळे आता लाभार्थी लाडक्या बहिणींना या हप्त्याची प्रतिक्षा आहे.

How to check installment of Ladki Bahin Yojana

माझी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला दीड हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. पण बहुतांशवेळा तो जमा झाला की, नाही हेही अनेकींना लवकर कळत नाही, त्यामुळेच आम्ही लाडकी बहिण योजेनेचा बँक खात्यात हप्ता आला की नाही हे तपासण्याच्या काही पद्धती सांगत आहोत. या स्टेप्स वापरुन तुम्ही बँक खात्यात पैसा जमा झाला की, नाही हे तपासू शकता.

Take a Poll

खात्यात दीड हजार रुपये जमा झाले की नाही असे तपासा..

नारी शक्ती दूत अ‍ॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून "नारी शक्ती दूत" अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.

लॉगिन प्रक्रिया: अ‍ॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि "लाडकी बहीण योजना" पर्याय निवडा.

मंजूर यादी तपासणी: अ‍ॅपच्या मुख्य पानावर "मंजूर यादी" किंवा "अर्जाची स्थिती" हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.

पोर्टलवर तपासणी कशी करायची?

अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. "अर्जदार लॉगिन" पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि "मंजूर यादी" विभागात जा आणि तपासा.

आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.

स्थिती तपासा : अ‍ॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.

ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.

या महिलांना मिळणार नाही जूनचा हप्ता

लाडक्या बहिणींना बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा जरी असली तरीही काही महिलांना या महिन्यात दीड हजारांचा हप्ता मिळू शकणार नाही. महाराष्ट्र लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्रता नियमांनुसार, काही महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. कुणा-कुणाला अपात्र घोषित केले गेले.

21 वर्षांखालील महिला किंवा ज्या महिलांचे 65 वर्षापेक्षा अधिक वय झाले आहे अशा महिला पात्र ठरणार नाहीत.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेले अर्जदार महिलांना आणि सरकारी कर्मचारी असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळणार नाही या अपात्र ठरवलेल्या आहेत.

ट्रॅक्टर वगळता ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहने आहेत, ज्यांना आधीच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

महाराष्ट्रातील अनिवासी असलेल्या महिला आणि वरील कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत आणि अधिकाऱ्यांनुसार, पडताळणी मोहीम सुरूच राहणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+