41 किलो चांदी, सव्वा किलो सोने, 8 कोटींची शेअर्स गुंतवणूक; जाणून घ्या, अजित पवारांची संपत्ती किती?

Ajit Pawar NetWorth : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी बारामती मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून अजित पवारांकडे किती संपत्ती आहे, याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे 2019 पासून ते आजपर्यंत त्यांच्या संपत्तीत सुमारे 10 कोटींची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

अजित पवार यांच्याकडे संपत्ती किती?

अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 7 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांची पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे 6 लाख 65 हजार 400 रुपये रोख आहेत.

तर अजित पवार यांच्याकडे बँकेत ठेवीच्या रुपात 3 कोटी 9 लाख 69 हजार 53 रुपये आहेत. तर त्यांची पत्नी सुनेत्र पवार यांच्या बँक खात्यात एकूण 3 कोटी 69 लाख 92 हजार 91 रुपयांच्या ठेवी आहेत. अजित पवार यांच्याकडे 24 लाख 79 हजार 760 रुपयांचे बाँड्स आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 14 लाख 99 हजार 610 रुपयांचे बाँड्स आहेत.

Ajit pawar networth

8 कोटी 50 लाखांचे शेअर्स

अजित पवार यांच्याकडे पोस्ट ऑफिसमधील बचत आणि विम्याच्या रुपात त्यांनी 10 कोटी 79 लाख 2155 रुपये गुंतवलेले आहेत. तर सुनेत्रा पवार यांनी 44 लाख 29 हजार 463 रुपये गुंतवलेले आहेत. अजित पवार यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे 8 कोटी 50 लाख रुपयांचे शेअर्स आहेत.

दादा किती वाहनांचे मालक?

अजित पवार यांच्या नावे 3 ट्रेलर्स, टोयोटा क्रेमी, होन्डा सीआरव्ही, ट्रॅक्टर अशा वाहनांचा समावेश आहे. तर सुनेत्रा पवार यांच्या नावे ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर्स आहेत.

41 कोटी चांदी अन् सव्वा किलो सोने

अजित पवार यांच्याकडे 41.50 किलो चांदी आहे. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 35 किलो चांदी, 1.30 किलो सोने तसेच 28 कॅरेटचा हिरा आहे.

5 वर्षात स्थावर मालमत्तेत 10 कोटींची वाढ

गेल्या पाच वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे.2019 च्या तुलनेत स्थावर त्यांच्या मालमत्तेत 10 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 37 कोटी 15 लाख 70 हजार 29 रुपये स्थावर, तर 8 कोटी 22 लाख 60 हजार 680 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 27 कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जाहीर केली होती.तसेच, 20 ठिकाणी जमीन, चार निवासी इमारती, एक व्यापारी संकुल इमारत, दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर अशी जंगम मालमत्ता असून, यंदा एका ट्रेलरची वाढ झाली आहे. तसेच संपत्तीमध्ये देखील वाढ झाली आहे

2019च्या प्रतिज्ञापत्रात काय होती नोंद?

2019 च्या तुलनेत स्थावर मालमत्तेत 10 कोटी रुपयांनी वाढ होत ३७ कोटी १५ लाख ७० हजार २९ रुपये इतकीस्थावर, तर आठ कोटी २२ लाख ६० हजार ६८० रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. पवार यांनी वैयक्तिक एक कोटी ७ लाख ९२ हजार १५५ रुपयांची विमा पत्रे, डाक बचतीत गुंतवणूक केली असून, २४ लाख ७९ हजार ७६० रुपयांचे शेअर, बंधपत्र (बॉण्ड), तर तीन कोटी ९ लाख ६९ हजार ५३ रुपयांच्या बँकांमध्ये ठेवी असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ मध्ये अजित पवार यांच्यावर वैयक्तिक एक कोटी पाच लाख रुपयाचे कर्ज होते,तुलनेने यंदा कर्जात वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ४ कोटी १० लाख ८६ हजार ७५५ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे.

तसेच सोने-चांदीबरोबर हिऱ्याचे दागिने वाढले आहेत. अजित पवार यांच्याकडे सद्यःस्थितीला ३८ लाख १ हजार ५३२ किमतीचे सोने-चांदी आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, भेटवस्तू, चांदीच्या मूर्ती आणि हिल्याचे दागिने असल्याचे जाहीर केले आहे. तर २०१९ मध्ये वैयक्तिक १३ लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असल्याचे नमूद केले होते. ही वाढ दुप्पट आहे.

बारामतीत काका पुतण्या संघर्ष..!

बारामती मतदारसंघात अजित पवार यांची आणि युगेंद्र पवार यांच्याशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. म्हणजेच बारामतीत काका-पुतण्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+