Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इतिहास आभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी; प्रकरण पोलिसांत गेल्यावर आला 'ट्विस्ट'

इतिहास आभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी ही धमकी देणाऱ्याचा काँल थेट फेसबुकवर पोस्ट केला. त्यानंतर गुन्हाही दाखल केला. आता सावंत ज्या व्यक्तीने आपल्याला धमकी दिल्याचे सांगत आहेत, तो व्यक्तीच समोर आला आहे. आपल्या नावाने कुणीतरी खोडसाळपणा केला असून, माझ्या नावाची सावंत यांनी बदनामी केल्याचे त्याचे म्हणणे आहे. या व्यक्तीनेच इंद्रजीत सावंत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

Threats to Indrajit Sawant

नेमके काय होते प्रकरण?

इतिहास आभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपूरमधील एका व्यक्तीने फोन करुन धमकी दिली. आपण ब्राम्हणद्वेषे आहात, असं म्हणत या व्यक्तीने सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे. सावंत यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटला धमकी देणाऱ्याचे नाव प्रशांत कोरटकर असून त्याचा काँल रेकाँर्डच पोस्ट केला.

सावंतांनी काय केली पोस्ट?

सावंत यांनी फेसबुक पोस्टवर लिहीले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन नागपूरमधील प्रशांत कोरटकर यांनी आपल्याला धमकी दिली. अशा धमक्या आपल्याला नवीन नाही. आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही. त्यांनी या पोस्टमध्ये प्रशांत कोरटकर यांचे नाव घेतले आहे. त्यांनी असा कॉल केल्याची माहिती त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे.

कॉल रेकॉर्डमध्ये काय काय?

या कॉल रेकॉर्डमध्ये इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप समोरच्या व्यक्तीने केला. आपण नागपूर येथून प्रशांत कोरटकर बोलत असल्याचा दावा कॉल करणाऱ्याने केला. सावंत यांनी आपले नाव गुगलवर शोधण्यास त्याने सांगितले. त्याने सावंत यांना अश्लाघ्य शिव्यांची लाखोली वाहिली. ब्राह्मणांची ताकद दाखवून देण्याची धमकीही दिली. कॉल करणाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे.

काय म्हणाले कोरटकर?

सावंत यांनी उल्लेख केलेले प्रशांत कोरटकर या प्रकरणानंतर समोर आले आहेत. आपण इंद्रजीत सावंत यांना ओळखत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी 15 वेळा आपले फेसबुक हॅक करण्यात आले. आपला नंबर सुद्धा हॅक झाल्याचा दावा, कोरटकर यांनी केला. सावंत यानी अगोदर आपल्याशी बोलून फेसबुक पोस्ट करायला हवी होती, असे कोरटकरांचे म्हणणे आहे. याप्रकरणी आपण सायबर पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे व सावंत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचेही कोरटकर यांनी सांगितले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+