हिंदुस्तानी भाऊंचा मनसेवर निशाणा; राज ठाकरे यांच्या युतीवरही उपस्थित केला सवाल

राज्यात सध्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मीरारोडमध्ये एका व्यापाऱ्याला केवळ मराठी न बोलल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या घटनेवरून आता हिंदुस्तानी भाऊ (विकास फाटक) यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट राज ठाकरे यांना उद्देशून त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

hindustani bhau mns


हिंदुस्तानी भाऊ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मनसेच्या भूमिकेचा निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की मराठी भाषा ही महाराष्ट्राचा अभिमान असून, ती प्रत्येकाने शिकली पाहिजे. मात्र त्यासाठी इतर राज्यांतून आलेल्या लोकांवर हात उचलणं चुकीचं आहे. मराठी शिकवण्यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये आणि समाजात जनजागृती करावी, पण दबाव, दहशत किंवा मारहाणीचा मार्ग स्वीकारू नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या प्रकरणावर बोलताना हिंदुस्तानी भाऊ यांनी हे ही म्हटलं की, इतर राज्यांत कामासाठी गेलेले मराठी युवक जर अशाच प्रकारे वागवले गेले, तर आपण सहन करणार का? महाराष्ट्राने कायमच इतरांचा आदर केला आहे आणि मराठी माणसांची संस्कृती देखील हीच आहे. त्यामुळे इथे आलेल्या हिंदू बांधवांशी गैरवर्तन किंवा हिंसाचार टाळावा, असे त्यांनी नम्रपणे सुचवले.

यासोबतच हिंदुस्तानी भाऊ यांनी राज ठाकरे यांच्या अलीकडील राजकीय युतीवरही प्रश्न उपस्थित केला. त्यांनी अप्रत्यक्षपणे हा मुद्दा उपस्थित केला की, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपशब्द वापरणाऱ्या किंवा हिंदू देवतांबाबत अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांसोबत मनसेने युती केली आहे. ही युती सामान्य हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी आहे, अशी त्यांची भूमिका आहे.

हिंदुस्तानी भाऊ यांच्या मते, हिंदुत्वाच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाने गोरगरीब आणि स्थलांतरित हिंदू नागरिकांशी सहृदयतेने वागायला हवे. केवळ भाषेच्या नावावर त्यांना शिवीगाळ, धमकी किंवा मारहाण करणे हे कोणत्याही न्याय्य तत्वात बसत नाही. भाषा हा सन्मानाचा मुद्दा आहे, द्वेषाचा नव्हे.

या पार्श्वभूमीवर हिंदुस्तानी भाऊ यांनी संपूर्ण हिंदू समाज एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली आहे. भाषेच्या नावावर समाजात फूट पडू नये, हेच त्यांनी या व्हिडिओमधून सूचित केलं. त्यांच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, तर काही मंडळींनी त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा देखील दर्शवला आहे. आता मनसेकडून या व्हिडिओला कशाप्रकारे उत्तर दिले जाईल ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+