Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईसाठी पुढचे 24 तास खूप महत्वाचे, पाऊस झोडपणार! राज्यात 7 दिवस पावसाचेच! जाणून घ्या हवामान

Heavy rains to hit Mumbai Thane : राज्यात पावसाने पुन्हा चांगलीच हजेरी लावली असून हा आठवडा पावसाचा राहणार आहे. आगामी पाच ते सात दिवस चांगल्या पावसाची शक्यता असून आज १२ ऑगस्ट रोजी मुंबईत जोरदार पावसाची तर राज्यातील काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाह पावसाची शक्यता आहे.

Heavy rains to hit Mumbai Thane

मुंबई आणि ठाणे हवामान अंदाज

आज १२ ऑगस्टला मुंबई, ठाणे, परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वादळी वारा आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

कोकण परिसर हवामान अंदाज

कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधूदुर्ग, जिल्ह्यात आज १२ आणि उद्या १३ ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे.

विदर्भात हवामान अंदाज

विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यात येत्या १५ ऑगस्टपर्यंत जोरदार तर बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील तेथे हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मराठवाड्यातील लातूर, नांदेड जिल्ह्यातजोरदार तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे.

मध्य-उत्तर महाराष्ट्रात कसे असेल हवामान

पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

१५ ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज

आज १२ ऑगस्ट

१२ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेनुसार विजांचा कडकडाट होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

१३ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१३ ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटात होऊ शकतो. विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

१४ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१४ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दोन्ही विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भाच बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहेत तर तुरळख ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.

१५ ऑगस्टला पावसाची कसा असेल पाऊस

१५ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+