Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात रात्रभर तुफान पाऊस, अनेक भागातील जनजीवन विस्कळीत

पुणे : पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातील काही भागात कंबरेइतकं पाणी साचलं आहे. तसेच सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांचे धान्य आणि घरातील साहित्य पाण्याने खराब झालं आहे. प्रशासनाकडून पाण्यात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना घरातच रहा सल्ला देण्यात आला आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Pune Rain

शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होत असल्याची माहिती आहे.

तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे. पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक भागात कंबरेइतकं पाणी साचलं आहे.त्यामुळे नागरिकांच्या दुचाकी आणि चारचाकी पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. संध्याकाळी धरणातून मुठा नदीमध्ये 55 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. आता तो विसर्ग वाढवला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 6 वाजता 55000 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच धरण परिसरात 100 मिमी व घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.या पावसामुळे पुणे शहरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

या परिसरात राहणा-या लोकांनी दक्षता घेण्यात यावी

भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .

गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .

शितळा देवी मंदिर डेक्कन.

संगम पूल पुलासमोरील वस्ती

कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.

होळकर पूल परिसर.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+