मुंबईत पावसाची पुन्हा दमदार हजेरी, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळी मुंबई शहर व उपनगरच्या अनेक भागात संततधार पाऊस पडत आहे. मुंबई, नवी मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई बरोबरच ठाणे परिसरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी 8.30 ते दुपारी 3.38 वाजेपर्यंत कुलाबा येथे (37.1मिमी), सांताक्रूझ (47.1 मिमी), दहिसर (32 मिमी), राममंदिर (50.5 मिमी), विक्रोळी (58.5 मिमी), चेंबूर (32 मिमी), शीव(78 मिमी), माटुंगा (57 मिमी) पावसाची नोंद झाली. दरम्यान, सायंकाळनंतर मुंबईतील पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Heavy rain

सध्या मोसमी वारे सक्रिय झाल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. तर, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे तसेच पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

अरबी समुद्रात सौराष्ट्रलगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम आहे‌ आणि दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळपासून मुंबई आणि परिसरात दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबई शहर तसेच उपनगरांत ढगाळ वातावरणसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, रविवारी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+