Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : जालन्यातील स्टील कारखान्याच्या भट्टीत भीषण स्फोट, 20 कामगार जखमी! 4 गंभीर

Heavy explosion in steel factory furnace in Jalna : जालना औद्योगिक वसाहतीमधल्या गजकेसरी स्टील कारखान्यात आज दुपारी लोखंड वितळण्याच्या भट्टीत अचानक स्फोट झाल्याने वीस कामगार गंभीर भाजले आहेत. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. जखमी कामगारांवर जालना शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमींमधल्या तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. जखमी कामगारांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही पोलीस अधीक्षक बन्सल यांनी सांगितलं आहे.

Blast in Gajkesari Steel Factory in Jalnaya Latest News in Marathi

बाॅयलरचा भीषण स्फोट

ज्या कंपनीत स्फोट झाला ती जालना एमआयडीसीत असून या कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाला, यात 20 कामगार जखमी झाले आहेत. तर यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. यातील काही जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आल्याचंही सुत्रांनी सांगितलं.

स्फोटानंतर वितळलेले लोखंड अंगावर

स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये स्फोट झाल्यानंतर त्यातील वितळलेले लोखंड अंगावर पडले. यामुळे सुमारे 20 जण भाजून जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात वेळीच हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तूर्त कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पोलिस अधीक्षक बन्सल यांनी माध्यमांशी संवाद साधला. या घटनेबाबत त्यांनी माहिती दिली. घटना घडताच कंपनीला बंद करून आत काम करणाऱ्या कामगारांचे मोबाईल हिसकावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपपोलिस अधीक्षक पीयूष निपाणीसह चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

घटनेची चौकशी सुरु

जालना अद्योगिक वसाहतीत घडलेल्या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहचले असून घटनेची चौकशी केली जात आहे. दरम्यान, जालना शहर हे स्टील कंपन्यांचे हब म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशांमध्ये परिचित आहे. येथे सुमारे 25 स्टील कंपन्या असून जवळपास 40 ते 50 हजार कामगार काम करतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+