Havaman andaj: राज्यात आजपासून 5 दिवस पावसाचा मुक्काम,'या' भागात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता!
Havaman andaj Maharashtra Rain : राज्यात काल २७ ऑगस्टला गणरायाचे आगमन झाले असून कालपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आता आणखी पाच दिवस बरसात सुरु राहणार आहे. महाराष्ट्रातील कोकणमध्ये बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात काही आणि तुरळक ठिकाणी २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीतील पावसाचे वातावरण राहील, असे पुणे वेधशाळेने सांगितले आहे.

मराठवाड्यात वीज, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
२८ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी ३०-४० किमी वेगाने वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Thunderstorms accompanied with lightning ,gusty winds 30-40kmph and light to moderate rainfall very likely to occur at isolated places in the districts of Marathwada during the period 27-31 Aug 2025. pic.twitter.com/eBnLS2B5Zv
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 27, 2025
पुण्यात आज कसे राहील हवामान?
पुण्यात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच हलका ते अती हलका पाऊस पडू शकतो. घाट विभागात तुरळक ठिकाण जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच पावसानं पुन्हा जोर धरल्याने गणेशभक्तांच्या आनंदावर काहीस विरजण पडले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कणकवली तालुक्यात सर्वाधिक ११५ मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात पुढचे काही दिवस पावसाचा जोर राहणार असून पुढचे दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, तारखेनिहाय पावसाची स्थिती पाहूया..
आज २८ ऑगस्ट २०२५
कोकण: बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील.
मराठवाडा: काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो.
मध्य महाराष्ट्र: बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ: बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
२९ ऑगस्ट २०२५
कोकण: बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो, तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील.
मराठवाडा: बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ: बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
३० ऑगस्ट २०२५
कोकण: बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा: काही आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.
मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.
विदर्भ: बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
३१ ऑगस्ट २०२५
कोकण: बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा: काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. तसेच तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.
मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भ: बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
०१ सप्टेंबर २०२५
कोकण: बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.
मराठवाडा: तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
विदर्भ: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
०२ सप्टेंबर २०२५
कोकण: बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो.
मराठवाडा: तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications