Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Hartalika Teej 2024: आज 'हरतालिका तीज', पूजेची वेळ,साहित्य,पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

Hartalika Teej 2024 : विवाहित स्त्रीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाणारे 'हरितालिका तीज' आज आहे. हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला पाळले जाते. आज विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत पाळले जाते. सायंकाळी गौरी-शंकराची पूजा केली जाते.

हा उपवास खूप कठीण मानला जातो. कारण त्यात 24 तास पाण्याशिवाय उपवास करावा लागतो. विशेष म्हणजे अविवाहित मुलीही हे व्रत पाळतात, असं मानलं जातं की, हे व्रत पाळणाऱ्या अविवाहित मुलीला तिचा आवडता आणि प्रेमळ जीवनसाथी मिळतो.

हरितालिका तीज पूजा मुहूर्त (Hartalika Teej 2024 Puja Muhurat)

हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 वाजता सुरू होतेय आणि ती 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 वाजता संपेल. तुम्ही कधीही पूजा करू शकता.

hartalika teej 2024

हरतालिका तीज 2024 पूजा साहित्य ( Hartalika Teej 2024 Puja Sahitya)

शिव आणि पार्वतीचे चित्र, लाकडी चौकटी, लाल किंवा पिवळे कापड, आंब्याची पानं, वाळू, बेलपत्र, शमी पत्र, पांढरी फुलं, पाण्याचा कलश, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध,तूप, तेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापूर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण, फणी आणि आरसा असं साहित्य लागणार आहे.

हरितालिका तीज पूजा विधि (Hartalika Teej 2024 Puja Vidhi)

- सकाळी आंघोळ केल्यावर सर्गीची पहिली पूजा केली जाते.

- नंतर स्त्रिया 16 अलंकार करतात आणि भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वतीची पूजा करतात.

- त्यासाठी वाळूपासून शंकर-पार्वतीची मूर्ती बनवून त्यांची पूजा करून त्यांचे लग्न लावून दिले जाते.

- जर घरी हे शक्य नसेल तर महिला आणि मुली मंदिरात जाऊन देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात.

- भजन, कीर्तन, उत्सव साजरे केले जातात.

विशेष गोष्ट (Hartalika Teej 2024 Significance)

असे मानले जाते की भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने जंगलात जाऊन अनेक वर्षे पाणी न पिता तपश्चर्या केली होती, त्यानंतर भगवान शिवाने तिला पत्नी म्हणून स्वीकारले.

Disclaimer: या लेखाचा अर्थ कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा निर्माण करण्याचा नाही. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. OneIndia Marathi या लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पडताळणी करत नाही, त्यामुळे कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडित यांचा सल्ला घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+