Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फडणवीसांचा शिलेदार फुटला! हर्षवर्धन पाटील म्हणाले- सर्वांसोबत बोललो, शरद पवारांनी शेवटी सल्ला दिला

महायुतीतून तिकीट न मिळण्याचं स्पष्ट झाल्यानंतर आज इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम केला. शुक्रवारी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहिर केला. याबाबत काल गुरुवारी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आज इंदापूरात कार्यकर्ता मेळावा घेत पाटील यांनी शरद पवार गटात जाणार असल्याचं सांगून टाकलं. शिवाय आगामी विधानसभेतही लढणार असल्याचं सांगितलं. मात्र तिकीट देण्याचा व पुढील नियोजन सांगण्याचा पक्षाचा अधिकार असल्याचं सांगत शरद पवार हेच पुढील निर्णय देतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Harshwardhan Patil

इंदापूरातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, जनतेचा आवाज एकच आहे मी निवडणूक लढवली पाहिजे. मी शरद पवारांना भेटलो त्यांनीही मला सांगितलं की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर तुम्ही सांगा राष्ट्रवादीत जायचं का? असं म्हणत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांनी होय आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाणार हे आता निश्चित झालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचीही घेतली भेट
हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या आठवड्यात आपण देवेंद्र फडणवीसांना भेटल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांची आणि माझी दीड ते दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी पण माझी भूमिका मांडली. मी त्यांना सांगितलं की तालुक्यांतल्या लोकांचा जो आग्रह आहे त्याविरोधात मला जाता येणार नाही. त्यावर मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली. असंही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं.

मुलगा व मुलीचे व्हाट्सअँप स्टेटस बदलले
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच त्यांचे पुत्र व कन्येने व्हाट्सअप स्टेटस बदलत तुतारीचा फोटो लावला होता. शिवाय हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यालयातील भाजपच्या नेत्यांचे फोटोही आज सकाळी काढण्यात आले होते. हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयावरील कमळ चिन्ह असलेला बोर्डही काढण्यात आला होता. पाटलांच्या या निर्णयानंतर इंदापूरात पु्न्हा एकदा दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत पहायला मिळणार आहे. दत्ता भरणेंची हॅट्ट्रीक पाटील रोखणार का, हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+