Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विश्वविजेच्यांच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस, विरोधकांची सडकून टिका

मुंबई- टी-२० विश्वचषक विजेच्या खेळाडूंच्या विशेष सत्काराचे मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर आयोजन करण्यात आले. त्यासाठी खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस बोलविण्यात आल्याने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Gujarat Bas

महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनीही गुजरातहून बस मागितल्यावरून टीका केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत आज खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीसाठी बीसीसीआयने एक विशेष बस तयार केली आहे. बसच्या चहुबाजूला भारतीय संघाने चषक उचलून केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो लावण्यात आले आहेत.

डबल डेकर बसमधून भारतीय खेळाडू सुमारे दीड किमीच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीनंतर संपूर्ण संघ बीसीसीआय कार्यालयात पोहोचेल, असे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी यासासाठी आज वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी ही घोषणा केली.

स्टेडियममध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, या बसचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोतील बसचा क्रमांक हा गुजरातचा असल्याने विरोधकांनी गुजरात धार्जिने सरकार म्हणून टिकेची तोफ डागली आहे.

हे सरकार गुजरात धार्जिने आहे म्हणत काँग्रेस, ठाकरे गट व शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. त्यात नाना पटोले, आदित्य ठाकरे व रोहित पवारांनी सरकारवर निशाना साधला.


रोहित पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनीही गुजरातमधून बस आणण्याबाबत नाराजी व्यक्त केली. मुंबईत भारतीय संघ येत आहे आणि जर का मिरवणूक काढली जात असेल, तर मुंबईची बेस्ट बस यासाठी वापरायला हवी होती. बेस्टची बस वापरली गेली असती, तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. बीसीसीआयने गुजरातहून बस आणलीच आहे, पण त्यांनी बेस्टच्या बसची निवड करायला हवी होती, असेही रोहित पवार म्हणाले.


रॅली मोबाईलवर दिसणार

टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर सायंकाळी 4 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 1, हिंदी 1, 3 आणि त्यांच्या YouTube चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे जे चाहते मुंबईत पोहचू शकणार नाही, त्यांना आता टीव्ही आणि मोबाईलद्वारे या विजयी रॅलीचा आनंद घेता येणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+