जसा बाप तशी लेक, सुप्रिया सुळे त्यांच्यातली 'किडकी बहीण' दाखवत आहेत; पडळकरांची जहरी टीका
Gopichand Padalkar on Supriya Sule : एकीकडे सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असे बोलतात. अन् दुसरीकडे अजित पवार लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत. पण सुप्रिया सुळे त्यांच्यामधील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवू लागले आहेत, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पडळकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला. जसा बाप तशी लेक त्यामुळे लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल, असे म्हणत पडळकर यांनी टीका केली.
काय म्हणाले पडळकर?
मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे तिघही मराठा आहेत,म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलत नाहीत, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले. त्यावर आता पडळकर यांनी जोरदार निशाणा साधला. पडळकर म्हणाले की, मुळात सुप्रिया सुळे यांच्या विधानाकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. कारण, मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इथं महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर कशाप्रकारे हल्लाबोल केला जात आहे. फडणवीसांना ब्राह्मण म्हणून त्रास दिला जात आहे. पवारांचा फॉर्म्युला पुरोगामीच्या नावाखाली गोष्टी बोलायच्या आणि जातीयवादाच्या नावाखाली राजकारण करायचे, पण देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरून उरले आहेत. ते असे काहीही करत नाही. णवीसांना यांना ज्या पद्धतीने हल्ला केला जात आहे. त्यासाठी काही माणसं पेरली जात आहे. काही संघटना हाताशी धरायच्या आणि फडणवीसांना हल्ला चढवायचा हे राजकारण केले जात आहे.
जसा बाप, तशीच लेक, अपेक्षा ती काय
पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे या लहानपणापासून त्यांच्याकडून हे सगळं शिकल्या असल्याची जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. जसा बाप तशीच लेक असं म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला.












Click it and Unblock the Notifications