Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवार राज्यातील मिनी औरंगजेब, भाजप नेते पडळकरांची जहरी टीका; म्हणाले- पवारांच्या दुकानाला कुलूप..

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जहरी टीका केली आहे. शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

शरद पवार यांच्यासमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आली होती, ही घोषणाबाजी करणारे कोण आहेत? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. त्या लोकांची चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी देखील पडळकर यांनी केली.

Gopichand Padalkar

गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. त्यांच्यासमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. अशा घोषणा देणारे कोण आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पडळकरांनी केली आहे. धनगर समाजाचे वाटोळे हे शरद पवारांनीच केले असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

फडणवीस हे गोरगरीबांचे कवच कुंडल

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरिबांचे कवच कुंडल आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या दुकानाला कुलूप लावले आहेत म्हणून त्यांना लक्ष्य केले जात आहे. शरद पवारांच्या 50 वर्षांच्या राजकारणात त्यांनी कधी 100 आमदार देखील निवडून आणले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण काहीही बदललेले नाही. शरद पवार हे फुकटची हवा करत आहेत. त्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्त आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हायला हवे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाले होते. धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही प्रशासकिय अधिकारी प्रयत्न करीत आहे. तसेच आदिवासी विरोधात वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध म्हणून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको करत आंदोलन केले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+