पडळकरांच्या 'त्या' समर्थकावर कारवाईचा बडगा! विधानसभा अध्यक्षांची माहिती, आव्हाडांची प्रतिक्रीया काय?
Gopichand Padalak Jitendra Awhad Disput : विधीमंडळाच्या परिसरात काल १७ जुलै रोजी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांत हाणामाऱ्या झाल्या. यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली असून गोपीचंद पडखळकरांच्या कार्यकर्त्यांवर रात्रीपर्यंत कारवाई झाली नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी काल समर्थकांसह पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं. त्यानंतर आज विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले.
दरम्यान आज जितेंद्र आव्हाड समर्थकानंतर पडळकरांच्या समर्थकांवर फौजदारी कारवाई होत असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळ परिसरात काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात सांगितलं. हे दोघेही विधिमंडळात अनाधिकृतपणे आले होते. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती असं अध्यक्ष म्हणाले.
काय घडला होता प्रकार?
विधानभवनाच्या लॉबीत १७ जुलैला सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये थेट विधिमंडळाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या वादाची सुरुवात मागील आठवड्यात झाली होती, जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ परिसरात गोपीचंद पडळकर यांना पाहून 'मंगळसूत्र चोर' अशी घोषणाबाजी केली होती.यावर पडळकर संतापले होते.
5 दिवसानंतर बुधवारी १६ जुलैला विधानभवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर गुरुवारी १७ जुलैला पडळकरांच्या एका समर्थकाने आव्हाड यांना मारण्याची धमकी दिली होती. या धमक्यांचे पडसाद विधानभवनाच्या लॉबीत उमटले, जिथे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात अक्षरशः कपडे फाटेपर्यंत जोरदार हाणामारी झाली.
विधानसभा अध्यक्षांची मोठी घोषणा
"यापुढे विधानसभेचे अधिवेशन जेव्हा, जेव्हा असेल तेव्हा फक्त विधानसभा सदस्य (आमदार), त्यांचे स्वीय सहायक (पीए) आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे." असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज घोषणा केली.
पाच जणांची मारहाण पण एकालाच अटक - जितेंद्र आव्हाड
विधिमंडळ परिसरात आपल्या कार्यकर्त्याला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाच कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मात्र केवळ एकाच जणाला अटक झाली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणामुळे भाजपची सुसंस्कृत प्रतिमा धुळीस मिळाली असं आव्हाड म्हणाले. नितीन देशमुख माझ्यासोबत नव्हते असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, काल विधानभवन परिसरात झालेल्या राड्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात ते म्हणाले, "हा विद्रोही तुकारामांचा महाराष्ट्र आहे.इथ बंडाचा आवाज दाबता येईल,या आविर्भावात इथल्या सरकारने राहू नये..! आम्ही षंढ नाहीं आहोत.शिव, शाहू,फुले,आंबेडकरांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे.आम्ही लढत राहू...सत्याचा विजय होईपर्यंत..!"
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications